मुंबई : सलाड करताना किंवा सकाळी घाई नको म्हणून भाजीसाठी अनेकजण रात्रीच कांदा कापून ठेवतात. टाईम मॅनेजमेंट्च्या दृष्टीने हे योग्य वाटत असले तरीही आरोग्याच्यादृष्टीने मात्र ही सवय त्रासदायक ठरू शकते. फ्रीजमध्ये कांदा कापून ठेवल्याने तो खराब होण्याची दाट शक्यता असते. मळलेलं कणीक फ्रीजमध्ये साठवून वापरल्यास आरोग्यावर होतात 'हे' गंभीर परिणाम


कांद्यामधील फायदेशीर घटक -  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कांद्यामध्ये अनेक औषधी, अ‍ॅन्टीबॅक्टेरियल, अ‍ॅन्टी इन्फ्लामेटरी घटक असतात. यामुळे हृद्याचे आणि आतड्याचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. फ्रीजमध्ये कापलेला कांदा ठेवल्याने त्यामधील घटक नष्ट होतात. 


काय आहे संशोधकांचा दावा ? 


सोललेला कांदा फ्रीजमध्ये ठेवणं आरोग्याला नुकसानकारक आहे. एका संशोधनातून समोर आलेल्या अहवालानुसार, सोललेला कांदा आरोग्यसाठी नुकसानकारक आहे. कांद्याची सालं काढल्यानंतर त्याला बॅक्टेरियाचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक वाढते. यामुळे कांदा ऑक्सिडाईज होतो. त्यामुळे जेव्हा गरज असेल तेव्हाच कांदा कापून तो आहारात वापरावा.  


कसे होते नुकसान ? 


तुम्ही जेव्हा कांदा कापता तेव्हा त्यामधील सेल्स तुटून पाणी आणि फ्ल्युईड्स रिलीज होतात. सोबतच न्युट्रीएन्ट्सची क्षमता देखील बॅक्टेरियामुळे कमी होते. हे आरोग्यासाठी नुकसानकारक आहे. अत्यंत थंड किंवा गरम वातावरणामध्ये कांदा ठेवल्यास त्यातून पाणी वाहायला सुरूवात होते. त्यामुळे यावर बॅक्टेरिया वाढतात. हळूहळू ते सडायला सुरूवात होते. 


कापलेला कांदा कसा ठेवाल ? 


कापलेला कांदा तुम्हांला फ्रीजमध्ये ठेवायचा असल्यास किंवा भविष्यात वापरायचा असल्यास तो पेपर टॉवेलमध्ये गुंडाळणं आवश्यक आहे. युनायटेड स्तेट्स डीपार्टमेंट ऑफ अ‍ॅग्रीकल्चरच्या अहवालानुसआर, कापलेला कांदा फ्रीजमध्ये ठेवताना तो सीलबंद डब्ब्यामध्ये भरून ठेवा. फ्रीजचं तापामान 4.4 डिग्री सेल्सियस असेल याची काळजी घ्या. आरोग्याशी खेळ होऊ नये याकरिता कापलेला कांदा ताबडतोब वापरणंच आरोग्यासाठी सुरक्षित आहे.कांंद्याप्रमाणेच या ११ वस्तू फ्रिजमध्ये अजिबात ठेऊ नका!