मळलेलं कणीक फ्रीजमध्ये साठवून वापरल्यास आरोग्यावर होतात 'हे' गंभीर परिणाम

सकाळसाठी रात्रीच कणकेचं पीठ भिजवण्याची सवय असणार्‍यांनो ! सावधान 

Updated: Jun 7, 2018, 07:27 AM IST
मळलेलं कणीक फ्रीजमध्ये साठवून वापरल्यास आरोग्यावर होतात 'हे' गंभीर परिणाम  title=

मुंबई : आजकाल सार्‍यांचेच आयुष्य धावपळीचे झाले आहे. त्यामुळे मुलांपासून घरात ऑफिसला जाणार्‍यांच्या डब्ब्याची सकाळी घाई नको म्हणून अनेक गृहिणी रात्रीच तयारी करतात. रात्रीच्या वेळेस तुम्ही भाजी कापून ठेवणं ठीक आहे. मात्र चपात्या किंवा पोळ्याचं कणीकही भिजवून ठेवणं आरोग्याला त्रासदायक आहे. या '7' वस्तू फ्रीजमध्ये साठवण्याची चूक कधीच करू नका !

काय आहे वैज्ञानिकांचे मत ? 

संशोधकाच्या दाव्यानुसार कणकेचं पीठ भिजवल्यानंतर त्याचा ताबडतोब आहारात समावेश करावा. मळलेलं पीठ साठवून ठेवल्याने आरोग्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. मळलेलं पीठ साठवून ठेवल्याने त्यामध्ये रासायनिक बदल होण्याची शक्यता असते. त्यामुळे मीठ खराब होण्यास सुरूवात होते. अशा साठवलेल्या पीठाच्या पोळ्या खाणं आरोग्याला त्रासदायाक आहे. 

समज - गैरसमज 

शिळ्या अन्नाबाबत आपल्या समाजात, संस्कृतीमध्ये अनेक समज गैरसमज आहेत. मळलेलं पीठ फ्रीजमध्ये साठवणं हे पिंडाप्रमाणे असते. याचे भक्षण करण्यासाठी घरात भूत -प्रेतांचा प्रवेश होतो असे मानूनदेखील अनेकजण कणकेचं पीठ साठवणं टाळतात. 

शिळ्या किंवा साठवलेल्या पीठाचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम 

फ्रीजमध्ये साठवलेल्या पीठापासून पोळ्या केल्यास त्यामुळे पोटात गॅस होणं, पचन प्रक्रियेमध्ये बिघाड होणं, बद्धकोष्ठतेचा त्रास वाढण्याची शक्यता असते.