मुंबई : ब्रेकअपमुळे बाजार उठलेल्या आणि बेजार झालेल्या समस्त दिलजले आशिक मंडळीसाठी महत्वाची बातमी आहे. रिलेशनमध्ये असताना प्रियकर आणि प्रेयसीमध्ये सर्व गुडीगुडी सुरु असतं. पण एखाद दिवशी खटके उडतात, प्रकरण इतकं ताणलं जातं की ब्रेकअपशिवाय पर्याय राहत नाही. नाईलाज म्हणून दोघे एकमेकांपासून दूर होतात. पण यानंतर आशिक मंडळींची  कसोटी सुरु होते. खाणंपिणं सोडण्यात येतं, कशातही मन लागत नाही. सतत चिडचिड होते. प्रत्येक मुलीत एक्सचा चेहरा दिसू लागतो. कधीकधी एक्स स्वप्नातही येते. मग काही जण जुने चॅट्स वाचतात. एकमेकांचे सोबत काढलेले फोटो पाहतात. त्यामुळे मनावर आणखीज जोरदार आघात होतो. शेवटी शेवटी होतं काय, एक्सला विसरणं शक्य होत नाही. पण आम्ही तुम्हाला या 6 ट्रीक्स सांगतोय, ज्यामुळे एक्स तुमच्या आजू बाजूला सोडा स्वपनातही फिरकणार नाही. (If you are not able to forget your ex then try these 6 tricks) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेक जण त्यांच्या भूतकाळातील गोष्टी मनात दाबून ठेवतात. त्यामुळे आपण स्वत:ला मनात कुढत राहतो. त्यामुळे या गोष्टी डोक्यातून काढून देणंच महत्वाचं ठरतं. मनातील गोष्टी तुम्ही तुमच्या विश्वासू मित्राला सांगू शकता. तसेच मानसोपचार तज्ज्ञाचा सल्ला घेऊ शकता. तसेच मनातील भावना तुम्ही दररोज डायरीवर लिहून काढू शकता.  


भूतकाळात रिलेशनशीपमध्ये असताना जे काही घडलंय ते विसरणं म्हत्वाचं असतं. जीवनात पुढे जाण्यासाठी घडलेलं स्वीकारून जावं लागेल. त्यामुळे तुमचं मनो बलही उंचावेल.  


वर्तमानात जगण्याची सवय लावा. भूतकाळात जे घडलंय ते विसरुन अन भविष्याची चिंता करणार नाही, असं स्वत:ला आश्वासन द्या. यासाठी तुम्ही मेडिटेशनची मदत घेऊ शकता. 


जेव्हा केव्हा मनात उलटसुलट विचार येतील, तेव्हा 2-3 वेळा दीर्घश्वास घ्या.  स्वत:ला कोणत्या ना कोणत्या कामात गुंतवून ठेवा. डोकं रिकामी असल्याने मनात अनेक उलटसुलट विचार येतात. त्यामुळे तुम्ही रिकाम्या वेळेत छंद जोपासू शकता.


ब्रेकअपनंतर अनेक जण स्वत:कडे दुर्लक्ष करतात. पण काही महिन्यांनंतर याचे दुष्परिणाम दिसू लागतात. त्यामुळे स्वत:कडे लक्ष द्या. स्वत:वर प्रेम करायला शिका.  


ज्यांनी आपल्यासोबत विश्वासघात केलाय, त्यांना क्षमा करणं अवघड असतं. पण माफ केल्याने मन हलकं होतं. त्यामुळे समोरच्याला माफ किंवा दुर्लक्ष करायला शिका. 


संबंधित बातम्या : 


व्यक्तीचा प्रायव्हेट पार्ट कशामुळे झाला फ्रॅक्चर?; समोर आलं जगातील पहिलं असं प्रकरण


सोफ्यावर झोप म्हणजे व्याधींना आमंत्रण, नक्की काय त्रास होतो, जाणून घ्या...