Stop Drinking Tea: महिनाभर चहा पिणं बंद केल्यास...; तुमच्या शरीरात होतील `हे` मोठे बदल
Big changes come in the body after stopping drinking tea for a month : काहींना चहाची इतकी आवड असते की, चहा पिणं सोडण्याचा ते विचारही करू शकत नाही. मात्र तुम्ही कधी विचार केलाय का की, जर चहा पिणं सोडून दिलं तर त्याचा आपल्या शरीरावर कोणता आणि कसा फरक पडू शकतो.
Big changes come in the body after stopping drinking tea for a month : आपल्यापैकी अनेकांच्या दिवसाची सुरुवात चहानेच होते. काहींना तर सकाळी चहाचा घोट घेतला नाही तर त्यांच्या दिवसाची सुरुवात होत नाही. भारतीयांमध्ये सर्वात आवडीचं पेय म्हणजे चहा मानला जातो. मात्र आरोग्याच्या दृष्टीकोनातून चहा योग्य की अयोग्य?
काहींना चहाची इतकी आवड असते की, चहा पिणं सोडण्याचा ते विचारही करू शकत नाही. मात्र तुम्ही कधी विचार केलाय का की, जर चहा पिणं सोडून दिलं तर त्याचा आपल्या शरीरावर कोणता आणि कसा फरक पडू शकतो. चला तर मग जाणून घेऊया महिनाभर चहा पिणं सोडल्यास त्यानंतर तुमच्या शरीरात कसे बदल जाणवू लागतात.
हृदयाचं आरोग्य सुधारतं ( Improves heart health )
आपण दररोज पित असलेल्या चहामध्ये कॅफिनचं प्रमाण असतं जे तुमच्या हृदयाच्या आरोग्यावर परिणाम करू शकते. चहा प्यायल्याने तुमच्या हृदयाचे ठोके जलद होतात आणि त्यामुळे रक्तदाब वाढण्याची शक्यता असते. चहा पिण्याची सवय सोडून दिल्यास तुमच्या हृदयाचं आरोग्य सुधारण्यास मदत होऊ शकते. परिणामी हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होऊ शकतो.
शरीरात उर्जेची पातळी वाढते ( Increase in energy level )
चहा पिणं सोडून दिल्याने तुमच्या शरीरात उर्जेची पातळी वाढण्यास मदत होऊ शकते. चहामध्ये कॅफिन असल्यामुळे लोक चहाकडे आकर्षित होतात, पण त्यामुळे एनर्जीची कमतरता देखील होऊ शकते. चहा पिण्याची सवय सोडून दिल्याने तुम्हाला दिवसभर अधिक सक्रिय आणि उत्साही वाटू शकते.
खूप चांगली झोप येते ( Better Sleep )
चहामध्ये असलेलं कॅफिन तुमच्या झोपेवर परिणाम करू शकते. कॅफेन तुमच्या शरीरावर परिणाम करतं तुम्हाला चांगली झोप येण्यापासून रोखतं. चहा पिण्याची सवय सोडल्याने तुमची झोप सुधारू शकते, ज्यामुळे तुमचे मानसिक आरोग्यही सुधारू शकते. त्यामुळे चांगली झोप हवी असल्यास तुम्हाला चहाला बाय बाय म्हणावं लागणार आहे.
त्वचेचं आरोग्य सुधारतं ( Improves skin )
चहामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट त्वचेच्या अनेक समस्यांशी लढण्यास मदत करतात. चहाच्या अतिरिक्त सेवनामुळे तुम्हाला त्वचेच्या समस्या निर्माण होऊ शकतात. तुमची त्वचा कोरडी आणि निर्जीव देखील बनवू शकतात. चहा पिण्याची सवय सोडल्यास, तुमची त्वचेचं आरोग्य सुधारू शकतं.
हार्मोन्सचं संतुलन ( Improves Hormonal Balance )
चहामध्ये असलेले कॅफीन तुमच्या हार्मोन्सवरही परिणाम करू शकतं. ज्यामुळे हार्मोनल असंतुलन होतं. चहा पिण्याची सवय सोडल्याने तुमचे हार्मोन्स संतुलित राहतात. परिणामी इतर कोणत्याही समस्या तुम्हाला त्रास देणार नाहीत.