आता हार्ट अटॅकपूर्वीच धोका ओळखणं शक्य !
मुंबई : आजकाल तणावग्रस्त जीवनशैलीमुळे अनेक लाईफस्टाईलशी निगडीत समस्या वाढत आहेत. काही क्षणांपूर्वी हसत खेळत पाहिलेला माणूस अचानक हार्ट अटॅकच्या झटक्यामुळे या जगातून निघून गेल्याचं अनेकांसोबत घडलं आहे. कार्डिअॅक अरेस्ट किंवा हृद्यविकाराच्या तीव्र झटक्यामुळे उपचारापूर्वीच अनेकांनी प्राण गमावले आहेत. मग आता या समस्येचा धोका वेळीच ओळखण्यासाठी वैद्यकीय क्षेत्राला तंत्रज्ञानाची मदत मिळाली आहे. हार्ट अटॅक येण्यापूर्वीचे '5' धोकादायक संकेत
स्मार्टफोनची होणार मदत
आयआयटी पवईच्या विद्यार्थ्यांनी स्मार्टफोनच्या मदतीने हार्ट अटॅकचा धोका ओळखण्यासाठी खास उपकरण विकसित केलं आहे. त्यामुळे रक्ताचा थेंब आणि स्मार्टफोनच्या मदतीने हा धोका ओळखणं शक्य होणार आहे. 'या' रक्तगटाच्या रुग्णांंना हार्टअटॅकचा धोका कमी , संशोधकांंचा नवा खुलासा
हार्ट अटॅकचा धोका ओळखण्यासाठी कसे करते काम ?
आयआयटी पवईच्या बायो सायन्सच्या विद्यार्थ्यांनी हार्ट अटॅकचा धोका ओळखण्यासाठी खास उपकरण विकसित केलं आहे. बायो इंजिनियर विभागाचे प्राध्यापक सोमयो मुखर्जी यासाठी विद्यार्थ्यांना मदत करत आहेत. हृद्यविकाराचा झटका येतो तेव्हा रक्तामध्ये मायो ग्लोबिन आणि मायालो प्रोक्साईड हे घटक मिसळतात. रक्ताच्या चाचणीतून उपकराणातील संवेदक त्याची माहिती अवघ्या 15 मिनिटांमध्ये स्मार्टफोनला देतो. त्यातून हार्ट अटॅकच्या धोक्याबद्दल माहिती मिळते.
सुरूवातीला मायो ग्लोबिन घटक बाहेर पडतात, हे फारसे धोकादायक नसते. मात्र रक्तात मायालो प्रोक्साईड सापडल्यास हृद्याला असणारा धोका बळावतो. पॅथोलॉजीमध्येही ही चाचणी करता येऊ शकते. मात्र त्यासाठी अधिक पैसे मोजावे लागातात. सोबतच एक सिरीनपेक्षा अधिक रक्त लागते. आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी केवळ थेंबभर रक्ताच्या मदतीने हा धोका ओळखण्याची नवी आशा पल्लवित केली आहे. आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी हार्ट अटॅकप्रमाणेच ब्लड शुगर नियंत्रणात ठेवणार खास यंत्र विकसित केलं आहे.