मुंबई : आता कोरोनाच्या विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटची लागण झाली आहे की नाही हे तपासण्यासाठी आसामचे एक खास कीट तयार करण्यात आलं आहे. आसामचे शास्त्रज्ञांकडून हे कीट तयार करण्यात आलं आहे. या किटच्या माध्यमातून केवळ दोन तासांत ओमायक्रॉनचा संसर्ग ओळखता येणं शक्य असणार आहे. हे किट पूर्णपणे भारतात बनवलं असून यामध्ये हायड्रोलिसिस आरटी-पीसीआर प्रणाली चाचणीसाठी अवलंबली जाते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जागतिक महामारी कोरोनाचा कहर काहीसा कमी होताच आता ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटची भीती लोकांमध्ये दिसू लागलीये. त्याच वेळी, डॉक्टरांचा असा विश्वास आहे की, ओमायक्रॉन व्हेरिएंट वेगाने पसरतो. सध्या या व्हेरिएंटची तपासणी केल्यानंतर त्याची लागण झाली आहे की नाही हे समजण्यासाठी 3-4 दिवसांचा कालावधी लागतो.


दिब्रुगड ICMR-RMRCने तयार केलं किट


आसाममधील दिब्रुगढ ICMR-RMRC (प्रादेशिक वैद्यकीय संशोधन केंद्र) यांनी हे चाचणी किट विकसित केलं आहे. जे केवळ दोन तासांत ओमायक्रॉन व्हेरिएंटची माहिती देऊ शकेल. इथले डॉक्टर विश्व बोरकोटोकी यांनी हे किट विकसित केलं आहे. डॉ. बोरकोटोकी आणि ICMR च्या प्रादेशिक वैद्यकीय संशोधन केंद्राच्या टीमने रिअल-टाइम RT-PCR चाचणी किट तयार केली आहे. हे चाचणी किट वेळेची बचत करत आणि हे विमानतळांसाठी आवश्यक आहे.


100% अचूक परिणाम असल्याचा दावा


प्रयोगशाळेत चाचणी दरम्यान, या किटचा 100% अचूक परिणाम दिसून आले आहेत. सध्या नॅशनल व्हायरोलॉजी इन्स्टिट्यूट, पुण्यात याची चाचणी केली जात असून लवकरच निकाल जाहीर होईल. आशा आहे की, हे मेड इन इंडिया कीट लवकरच बाजारात उपलब्ध होईल.