HEALTH TIPS:   हिरव्या पालेभाज्या आणि त्यातून मिळणारी पोषक तत्व आपल्या स्किनसाठी किती फायदेशीर आहेत आपण जाणतोच ..मात्र तरीही काही जण हिरव्या पालेभाज्या खाताना नाक मुरडतो.. पण पालक हे खाण्यासाठी आणि पचनासाठी हलकं असत त्याच्याशिवाय पालकात विटामिन, खनिज तत्व आणि अमीनो एसिड भरपूर प्रमाणात असतं जे आपल्या शरीरासाठी अतिशय महत्वाचं आणि पोषक असं आहे .कच्चा पालक जर ज्यूस करून प्यायला तर त्यातून अधिक प्रमाणात पोषण मिळतं. जे केवळ शरीरालाच न्हवे तर केस आणि त्वचेसाठीसुद्धा तितकंच फायदेशीर आहे 


स्किनसाठी आहे खूप फायदेशीर 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोज एक ग्लास पालक ज्यूस प्यायल्याने चेहऱ्यावर तेज येऊ लागत 
चेहऱ्यावर डाग असतील किंवा सुरकुत्या असतील त्यासुद्धा कमी होण्यास मदत मिळते 
पालक ज्यूस चेहऱ्याला सॉफ्ट आणि  हायड्रेट ठेवण्यास मदत करतो 
पालक चा ज्यूस प्यायल्याने चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन होत नाही 


केसांसाठी आहे बहूउपयोगी 


पालक ज्यूस प्यायल्याने केसांशी संबंधित समस्या दूर होऊ लागतात 
डोक्यात सतत खाज उठत असेल तर ती समस्या निघून जाईल 
पालकात व्हिटॅमिन बी भरपूर प्रमाणात असल्याने केसांची वाढ चांगली होते 
केसांची चमक वाढवायची असेल तर पालक ज्यूस हा अत्यंत फायदेशीर आहे रोज प्यायलाच पहिजे 


आरोग्यासाठी तितकाच महत्वाचा 


पालक ज्यूस प्यायल्याने ऍनिमियाचा धोका कमी होतो 
संधिवात कमी होण्यास फायदेशीर 
हिरड्यांसंबंधित काहीही तक्रार असेल तर पालक ज्यूस प्यायलाच हवा 
रोज पालक ज्यूस प्यायल्याने कॅन्सरचा धोका कमी होतो 


त्यामुळे उत्तम आरोग्य आणि त्याचसोबत सुंदर चेहरा आणि  सुंदर केस हवे असतील तर रोज एक ग्लास पालक ज्यूस प्यायला सुरु करा .