Sharmila Tagore Cancer :  बॉलिवूडमधील प्रसिद्ध आणि ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी वयाच्या 13 व्या वर्षांपासून अभिनयाला सुरूवात केली. अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केलंय. पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, शर्मिला यांनी कर्करोगाशी लढा दिला होता. होय, खुद्द अभिनेत्रीने 'कॉफी विथ करण' या कार्यक्रमात याचा खुलासा केला होता. आरोग्याच्या चिंतेमुळे त्यांनी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात त्यांना सोडावा लागला होता, असं त्यांनी सांगितलं होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शर्मिला टागोर यांनी त्यांना कोणत्या प्रकारच्या कर्करोगाने गाठलं होतं, याबद्दल काही सांगितलं नाही. पण करोनाचा संकटात त्यांना आरोग्याविषयी खूप चिंता वाटली होती. त्यांनी सांगितलं की त्यावेळी त्यांनी करोनाची कुठलीही लस देखील घेतल नव्हती. कारण त्यांना कोणत्याही प्रकारचा धोका पत्करायचा नव्हता. बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी कन्सरशी लढा देऊन त्यावर मात केलीय. त्यात यादीत शर्मिला टागोर यांचं नावही सामील झालंय. 


कर्करोगाची सुरुवातीची लक्षणं


कर्करोग वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या प्रकारे प्रभावित करतो. काही लोकांना लक्षणं दिसत नाहीत, तर काहींना असामान्य बदल जाणवू शकतात. म्हणून, आपल्यासाठी काय सामान्य आहे हे जाणून घेणं महत्वाचंय. तुम्हाला काही असामान्य बदल वाटत असल्यास, ताबडतोब तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा. हे कर्करोगाचे लवकर निदान करण्यात मदत करू शकतं, अशात उपचार यशस्वी होण्याची शक्यता जास्त असते.


कर्करोगाची 15 सामान्य लक्षणं


आता आपण कर्करोगाच्या काही सामान्य लक्षणं पाहूयात ज्यांना लोक सहसा किरकोळ समजून दुर्लक्ष करतात.


1. नैराश्य: सतत थकवा किंवा मानसिक उदासीनता.
2. अचानक वजन कमी होणे: कोणत्याही कारणाशिवाय वजन कमी होणे.
3. भूक बदलणे: अन्नामध्ये रस कमी होणे किंवा वाढणे.
4. वेदना: असामान्य वेदना जे बरे होत नाही.
5. रक्तस्त्राव: कोणत्याही स्पष्ट कारणास्तव रक्तस्त्राव होणे (उदा: तोंड, नाक किंवा पोटातून).
6. बद्धकोष्ठता: सतत बद्धकोष्ठतेची समस्या.
7. त्वचेतील बदल: ताजेपणा नसणे किंवा कोणतेही डाग वाढणे.
8. श्वास घेण्यात अडचण: कोणत्याही उघड कारणाशिवाय श्वास घेण्यास त्रास होणे.
9. असामान्य गुठळ्या: शरीराच्या कोणत्याही भागात गाठ येणे.
10. जळजळ होणे: लघवी करताना जळजळ होणे.
11. घसा खवखवणे: बराच वेळ घसा खवखवणे.
12. हाडांमध्ये वेदना: विशेषतः जेव्हा वेदना सामान्य क्रियाकलापांशी संबंधित नसते.
13. आवाजात बदल: कोणत्याही उघड कारणाशिवाय आवाजात बदल.
14. झोपेच्या समस्या: सतत झोप न लागणे किंवा निद्रानाश.
15. त्वचा बदल: नवीन moles किंवा असलेल्या moles मध्ये बदल.


शर्मिला टागोर यांचा कर्करोगाविरुद्धचा लढा प्रेरणादायी आहे. कर्करोगाच्या सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करता कामा नये, हे त्यांच्या अनुभवावरून स्पष्ट होते. तुम्हाला यापैकी कोणतीही लक्षणं दिसल्यास ताबडतोब वैद्यकीय सल्ला घ्या. जागरूकता आणि वेळेवर निदान हे कॅन्सरशी लढण्याची गुरुकिल्ली आहे. आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि नियमित तपासणी करणे हे सर्वात महत्त्वाच आहे.