मुंबई : सध्या काळ्या तांदळाची (Black Rice) खूप चर्चा आहे. या तांदळाचा रंग पाहून अनेकांना आश्चर्य वाटतं. अनेकांना प्रश्न पडतो की हा तांदूळ काळा का होतो? या तांदळात अँथोसायनिन (anthocyanin) नावाचे एक संयुग आढळते. ज्यामुळे त्याला हा रंग मिळतो. असं मानलं जातं की काळा भात खाणं खूप फायदेशीर असतं. या काळ्या तांदळाबाबत आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. काळा तांदूळ नेहमीच्या पांढऱ्या भातापेक्षा कसा वेगळा आहे हे सांगणार आहोत. तसेच काळ्या तांदळाची किंमत किती आहे, बाजारात कुठे खरेदी करू शकता हे देखील सांगणार आहोत. (know black rice benefit for health read details) 


हृदयाच्या अनेक आजारांपासून बचाव


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काळा तांदूळ हृदयासाठी खूप फायदेशीर मानला जातो. यामध्ये आढळणारे अँथोसायनिन हृदयासाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे अनेक हृदयरोग होण्यापासून बचाव होतो. 


लोहाचा उत्तम स्रोत


काळ्या तांदळात लोहाचे प्रमाण चांगले असते. शरीराच्या इतर भागांमध्ये ऑक्सिजन पोहोचवण्यासाठी लोह स्वतःच उपयुक्त आहे. ज्या लोकांमध्ये रक्ताची कमतरता आहे ते काळ्या तांदळाचे सेवन करू शकतात. 


कोलेस्ट्रॉल कमी करण्यास उपयुक्त


अँथोसायनिन नावाच्या पदार्थामुळे काळा तांदूळ कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे काम करतो. अँथोसायनिन कोलेस्ट्रॉल कमी करते आणि शरीर निरोगी ठेवते, असे अनेक संशोधनातून समोर आले आहे.


कर्करोगाचा धोका कमी करतो


काळ्या तांदळामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो, असं अनेक संशोधनांमध्ये समोर आलं आहे. 


डोळ्यांसाठी फायदेशीर


काळे तांदूळ डोळ्यांसाठीही खूप फायदेशीर आहे हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. त्यामध्ये ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन नावाचे पदार्थ असतात, जे दृष्टी टिकवून ठेवण्यास मदत करतात.


काळा तांदूळ कुठे खरेदी करायचा?


बाजारात काळा तांदूळ मिळत नाही. पण तुम्ही ते सहज ऑनलाइन खरेदी करू शकता. तुम्हाला ते 250-350 रुपये प्रति किलोच्या दरम्यान सहज मिळेल. काळ्या तांदळाचं सेवन कोणत्याही वेळी करू शकता.