मुंबई : दुखापतीमुळे नसा खेचू लागल्यावर किंवा पायात अचानक गोळा येऊ लागतात, त्यामुळे पाय सुजणे सामान्य आहे. सूज आल्यानंतर एवढा त्रास होतो की चालणेही कठीण होते. बर्‍याच वेळा गरम पट्टी बांधून या समस्येपासून सुटका मिळू शकते, परंतु असं केल्यानं जळजळ देखील होऊ शकते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुजलेल्या पायांसाठी मोहरीचे तेल
पायांची सूज औषधाने बरी होऊ शकते, परंतु जर तुम्हाला औषधाची अॅलर्जी असेल तर तुम्ही घरगुती उपाय करू शकता. अशा समस्यांवर मोहरीच्या तेलानं मसाज करणं हा एक प्रभावी उपाय आहे. चला जाणून घेऊया कोणते ते ३ उपाय आहेत, ज्यांच्या मदतीनं पायांची सूज दूर केली जाऊ शकते.


1. हळद आणि मोहरी तेल
मोहरीच्या तेलात हळद मिसळून सूजलेल्या भागावर मसाज करा. हळदीमध्ये प्रतिजैविक आणि जंतुनाशक गुणधर्म असल्याने वेदनांवर चांगला परिणाम होतो.


2. मोहरीचे तेल आणि लवंग
पायाची सूज दूर करण्यासाठी मोहरीच्या तेलात लवंग टाकून मंद आचेवर गरम करा. आता या तेल वापरून ज्या भागात सुज आली आहे तिथे मसाज करा. हे केवळ सूज दूर करत नाही तर रक्त प्रवाह देखील सुधारते.


3. आले आणि मोहरी तेल
जर तुम्ही एका भांड्यात मोहरीचे तेल आणि आले गरम केले तर सुजलेल्या भागावर मसाज करा. यामुळे त्रासांपासून मुक्ती मिळेल. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मसाजसोबत कच्चे आले देखील खाऊ शकता.
(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)