मुंबई : काही जणांना बसल्या जागीदेखील अचानक चक्कर येण्याचा त्रास येतो. वेळीच या समस्येकडे लक्ष न दिल्यास तुम्हांला अनेक त्रास शकतात. परिणामी यामधून अनेक  समस्या वाढतात. म्हणूनच चक्करचा त्रास कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय फायदेशीर ठरतात.  


 चक्करचा त्रास कसा कराल कमी ?  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 चक्करचा त्रास अधिक धोकादायक होऊ नये म्हणून आवळा खाणं फायदेशीर ठरतं. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी घटक मुबलक प्रमाणात आढळतात. आवळा शरीरात रोगप्रतिकारक्षमता वाढवण्यास मदत करतात. 


 कसा कराल आवळ्याचा वापर ?  


दोन आवळे मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावेत. यामध्ये 2 चमचे धन्याचे दाणे मिसळा. त्यानंतर कपभर पाणी मिसळून हे मिश्रण रात्रभर ठेवा. सकाळी उठल्यावर हे मिश्रण गाळून  त्याचे केवळ पाणी प्यावे. 


मधाचा करा असा वापर 


आवळ्याप्रमाणेच मधदेखील चक्कर येण्याचा त्रास कमी करण्यास मदत करते. अ‍ॅपल सायडर व्हिनेगरमध्ये मध मिसळा. हे मिश्रण ग्लासभर पाण्यामध्ये मिसळून प्यायल्यास फायदा होतो.