मुंबई : सध्या सुट्टींचा काळ अंतिम टप्प्यामध्ये आला आहे. लवकरच मान्सुनचं आगमन होणार आहे. अशा वेळेत अनेकजण दक्षिण भारतातमध्ये ट्रीपचं प्लॅनिंग करतात. मात्र सध्या केरळ राज्यात 'निपाह' व्हायरसमुळे दहशत पसरली आहे. 10 जणांनी केरळमध्ये 'निपाह' व्हायरसच्या संसर्गाने आपला जीव गमवला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात तुम्ही केरळच्या दौर्‍यावर असल्यास काही गोष्टींचं भान ठेवणं आवश्यक आहे. केरळ दौर्‍यादरम्यान तुम्ही 'निपाह'च्या संसर्गापासून बचावण्यासाठी काही गोष्टींचं भान ठेवणं आवश्यक आहे. याकरिता Zen Multispeciality Hospital चे इंटर्नल मेडिसिन एक्सपर्ट  डॉ. विक्रांत शहा यांनी दिलेला हा खास सल्ला नक्की लक्षात ठेवा.  


'निपाह' पासून बचावण्यासाठी कोणती काळजी घ्याल? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्ही 'केरळ' दौर्‍यावर जाण्यासाठी प्लॅन केले असेल तर शक्यतो तो टाळणंच हितावह आहे. तुमचा आगामी केरळ दौरा अटळ असल्यास काही खास गोष्टींचं भान ठेवा. 


सध्या कोझिकोड जिल्ह्यात 'निपाह' व्हायरसची दहशत आहे. या भागापासून लांब रहा. तसेच केरळमध्ये फिरताना अतिशय गर्दीची ठिकाणं टाळा. 


खाण्याची निवड करताना पुरेशी काळजी घेणं आवश्यक आहे. शक्यतो मांसाहार टाळा. पोर्क, पिग ( डुक्कराचे मांस) खाणं टाळा. योग्यरित्या शिजवलेले पदार्थ खावेत. 


प्रवासात अनेकदा त्रास टाळण्यासाठी किंवा लोकल फूड न रूचल्यास फळं खाण्याकडे प्रवाशांचा ओढा असतो. मात्र सध्या फळं खाणं टाळा. वटवाघुळांनी खाल्लेल्या किंवा त्यांच्या संपर्कात आलेल्या फळांच्या सेवनामुळे 'निपाह' व्हायरस झपाट्याने वाढत आहे. निपाह व्हायरसची दहशत ; ही ३ फळे चुकूनही खावू नका


गर्दीच्या ठिकाणी फिरणं अटळ असल्यास प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मास्क तुमच्याजवळ ठेवा. शक्यतो कमी गर्दीच्या ठिकाणी रहा. 


इंफेक्शन झाल्याचा धोका वाटल्यास तात्काळ वैद्यकीय सेवांची मदत घ्यावी. कुटुंबातील इतर व्यक्तींपासून दूर रहा. 


प्रवासात मुबलक पाणी प्यावे. तसेच बाटलीबंद पाण्याची निवड करा. 


नुकतेच केरळ दौर्‍याहून परतलेल्या पर्यटकांनी त्यांना काही त्रास जाणवत असल्यास, अचानक सर्दी, ताप, तीव्र डोकेदुखी किंवा शुद्ध हरपल्यासारखे वाटत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा घेणं आवश्यक आहे. 'निपाह'चा सामना करण्यासाठी कस्तुरबा रूग्णालयात 'विशेष वॉर्ड' सज्ज करण्यात आला आहे.