मुंबई : देशभरात ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या रूग्णांमध्ये वाढ होताना दिसतेय. अशातच आता ओमायक्रॉनच्या व्हायरससंदर्भात एक नवी गोष्ट समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासानुसार, ओमायक्रॉन कोरोना व्हायरसच्या पूर्वीच्या व्हेरिएंटपेक्षा प्लास्टिक आणि त्वचेवर जास्त काळ टिकतो असं दिसून आलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका अभ्यासात ही बाब समोर आली आहे. यामध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंट त्वचेवर 21 तासांपेक्षा जास्त आणि प्लॅस्टिकच्या पृष्ठभागावर 8 दिवसांपेक्षा जास्त काळ जगू शकतो. ज्यामुळे कोरोनाच्या इतर व्हेरिएंटपेक्षा तो अधिक वेगाने पसरण्यास मदत होऊ शकते.


जपानमधील क्योटो प्रिफेक्चरल युनिव्हर्सिटी ऑफ मेडिसिनमधील संशोधकांनी SARS-CoV-2 वुहान स्ट्रेन आणि इतर सर्व व्हेरिएंटमध्ये (VOCs) पर्यावरणीय स्थिरतेतील फरकांचा अभ्यास केला. 


प्रिप्रिंट रिपॉझिटरी BioRxiv नुकतंच पोस्ट केलेल्या पीअर-रिव्ह्यू केलेल्या अभ्यासात असं दिसून आलंय की, अल्फा, बीटा, डेल्टा आणि ओमायक्रॉन व्हेरिएंट वुहान स्ट्रेनच्या तुलनेत प्लास्टिक आणि त्वचेच्या पृष्ठभागावर दुप्पट काळापेक्षा जास्च वेळ टिकून राहतो.


संशोधकांच्या म्हणण्याप्रमाणे, "हे Volatile organic compound उच्च पर्यावरणीय स्थिरतेमुळे कॉन्टॅक ट्रान्समिशनचा धोका वाढू शकतो. आणि यामुळे याचा प्रसार होण्यास मदत होते." अभ्यासातून असं दिसून आलंय की, ओमायक्रॉनमध्ये Volatile organic compound मध्ये सर्वाधिक पर्यावरणीय स्थिरता दिसून येते. ही स्थिरता डेल्टा व्हेरिएंटला बदलण्यात आणि वेगाने पसरण्यासाठी मदत करतात.


इतके तास जिवंत राहतो कोरोना व्हेरिएंट


प्लास्टिकच्या पृष्ठभागावर केलेल्या अभ्यासानुसार असं लक्षात आलं की, कोरोनाचा मुख्य स्ट्रेन 56 तास, अल्फा 191 तास , बीटा 156 तास, गामा 59 तास आणि डेल्टा व्हेरिएंट 114 तास जिवंत होता. त्या तुलनेत, ओमायक्रॉन व्हेरिएंट सर्वाधिक 193 तास जिवंत असल्याचं दिसून आलं. 


त्वचेच्या पृष्ठभागावर सरासरी व्हायरस जगण्याची वेळ अल्फा 19.6 तास, बीटा 19.1 तास, गामा 11 तास, डेल्टा 16.8 आणि ओमायक्रॉन 21.1 तास असल्याची नोंद करण्यात आली आहे.