मुंबई : आपल्या मुलांना स्मार्ट आणि हेल्दी बनवण्यासाठी अनेक पालक त्यांना वेगवेगळ्या क्लासेसना पाठवतात. मात्र काही गोष्टी मुलांच्या हेल्दी विकासासाठी तुम्ही स्वतः करणे गरजेचे आहे. सेलिब्रेटी न्युट्रिशियनिस्ट रुजूता  दिवेकर यांनी मुलांना हेल्दी आणि आनंदी ठेवण्यासाठी काही खास टिप्स दिल्या.


  • COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    मुलांना रिकाम्या पोटी शाळेत पाठवू नका. त्यांना सकाळी उठल्यावर दूध, सुकामेवा असे पौष्टीक पदार्थ द्या.

  • महत्त्वाचे म्हणजे मुलांना प्लास्टिकच्या टिफीनमधून जेवण देऊ नका. त्यांना घरी बनवलेले पदार्थ स्टीलच्या डब्यातून द्या. त्याचबरोबर प्लास्टिकची पाण्याची बॉटलही टाळावी.

  • रोज कमीत कमी एकदा तरी मुलांना तूप आणि गुळ घातलेली पोळी खायला घाला. कारण बदलत्या वातावरणात इंफेक्शन, ताप यापासून बचाव करण्यासाठी तूप-गुळ-पोळी फायदेशीर ठरते.

  • मॉलमध्ये फिरायला नेवून आणि रेस्टॉरंटमध्ये जंक फूड खायला घालून त्यांना आनंदी करण्याचा सध्याचा ट्रेंड आहे. मात्र असे न करता त्यांना मोकळ्या ठिकाणी फिरायला न्या. खुल्या हवेत, निसर्गाच्या सानिध्यात त्यांना खेळू द्या.

  • मुलांना टी.व्ही. पाहायला फार आवडतो. पण त्यांना त्यासाठी अगदी मनाई न करता ३० मिनिटे टी.व्ही. बघून द्यावा. कारण त्यापेक्षा अधिक वेळ टी.व्ही. समोर बसल्याने मुलांची उंची, ताकद आणि स्फुर्तीवर विपरित परिणाम होईल.