मुंबई : असे म्हटले जाते की, चांगले जेवण खाल्याने आपले आरोग्य चांगले राहाते, तसेच यामुळे आपल्याला शरीराशी संबंधीत कोणत्याही समस्या येत नाहीत. यामुळे डॉक्टर देखील आपल्याला नेहमी चांगल्या आणि पोष्टीक गोष्टी खाण्याचा सल्ला देतात. डाळ ही पोष्टीक आहे, याशिवाय हिरव्या भाज्या देखील शरीराला चांगले घटक मिळवून देण्यासाठी मदत करतात. परंतु असे असले तरी काही डाळींचे सेवन करणं आपल्या आरोग्यासाठी धोक्याचं असू शकतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विशेषतः रात्रीच्या वेळी अशा डाळींचे सेवन करणे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते. खरंतर काही डाळी पचायला जड असतात, त्यामुळे रात्रीच्या वेळी त्या डाळी खाल्यामुळे शरीराला आणि पोटाला त्रास होतो.


या डाळींमध्ये मसूर आणि उडदाच्या डाळीचा समावेश आहे. चला तर मग जाणून घेऊया की, या डाळी खाल्यामुळे तुम्हाला कोण-कोणते नुकसान होऊ शकते.


बद्धकोष्ठता वाढू शकते


उडदाची डाळ पचायला थोडी अवघड असते. म्हणून, ते जास्त प्रमाणात खाण्याचा सल्ला दिला जात नाही. विशेषत: तुम्ही रात्रीच्या वेळी या डाळीचे सेवन केले, तर तुमचे आरोग्य बिघडू शकते. त्यामुळे अशा लोकांनी या डाळींपासून लांबच रहावं.


यूरिक ऍसिडचा धोका वाढतो


युरिक ऍसिड वाढवण्यासाठी या डाळी आघाडीवर आहे. म्हणजेच ज्या लोकांना आधीच युरिक ऍसिडची समस्या आहे, त्यांनी या डाळपासून दूर राहावे, अन्यथा तुमची समस्या वाढेल आणि हात-पाय दुखू लागतील.


किडनी स्टोन अलर्ट


उडदाच्या डाळीमुळे किडनी स्टोन होऊ शकतो. म्हणजेच किडनी तंदुरुस्त ठेवण्यासाठी तुम्हाला या डाळींपासून लांब रहावे लागेल, अन्यथा तुमच्या किडनीमध्ये काही समस्या निर्माण होऊ शकतात, ज्यामुळे तुमच्यावर नेहमी हॉस्पिटलच्या फेऱ्या मारण्याची वेळ येईल.