... म्हणून काकडीवर पाणी पिण्याची चूक नकोच
सलाड, सॅन्डव्हिचमध्ये हमखास काकडीचा समावेश केला जातो.
मुंबई : सलाड, सॅन्डव्हिचमध्ये हमखास काकडीचा समावेश केला जातो. उन्हाळ्याच्या दिवसात थंडगार काकडी नैसर्गिकरित्या शरीरात थंडावा निर्माण करायला मदत करते. काकडीपासून अनेक पदार्थ बनवले जातात. मात्र काही लोकांना काहीही खाल्लं की त्यानंतर त्यावर थेट पाणी पिण्याची सवय असते. काकडीच्या सेवनावर पाणी पिण्याची सवय आरोग्याला त्रासदायक आहे.
काकडी सोलून खा किंवा थेट सालीसकट खा.. पण त्यावर लगेजच पाणी पिणं काही लोकांसाठी कसे त्रासदायक ठरते हे तुम्हांला ठाऊक आहे का? जाणून घ्या - खाल्ल्यानंतर लगेच पाणी का पिऊ नये
काकडीमध्ये पोषकघटक
काकडीमध्ये सुमारे 95% पाण्याचा अंश असतो. सोबतच काकडीत व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, कॉपर, मॅग्नेशियम, पोटॅशियम, मॅग्नीज घटक असतात.
काकडीवर लगेजच जेव्हा पाणी प्यायले जाते तेव्हा या पोषक घटकांचा शरीराला फायदा होत नाही. शरीराला आवश्यक असणारे पोषक घटक शोषले न गेल्याने त्याचे सेवन निष्फळ ठरते.
नेमका कोणता त्रास होतो?
काकडीवर पाणी प्याययास पचनाशी निगडीत काही त्रास वाढतात. खाल्लेलं अन्न पचवण्यासाठी शरीराला विशिष्ट पीएच लेव्हलची गरज असते. काकडीसोबत किंवा काकडीच्या सेवनानंतर लगेच पाणी प्यायल्यास पीएच लेव्हल कमी होते. खाल्लेलं पदार्थ पचवण्यासाठी आवश्यक अॅसिड नसल्याने पचनकार्य कमजोर होते. परिणामी पचनाशी निगडीत समस्या बळावतात.
डायरिया आणि लूज मोशनचा त्रास होत असल्यास काकडीच्या सेवनावर पाणी पिण्याची चूक करू नका. काकडीमुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो, पचन सुधारण्यास मदत करते. मात्र काकडीवर पाणी प्यायल्यास बद्धकोष्ठता आणि डायरियाचा त्रास वाढवतात. सकाळी उपाशीपोटी पाणी पिण्याचे 6 फायदे
कधी प्याल पाणी?
काकडी खाल्ल्यानंतर तुम्ही अर्धा तासानंतर पाणी पिऊ शकता. प्रत्येकाला 8 ग्लास पाण्याची गरज - सत्य की निव्वळ गैरसमज ?