या कारणांमुळे महिला धोकेबाज पतीला माफ करतात!
समाज्यात एक्स्ट्रा मॅरेटीअल अफेअरच्या अनेक प्रकरणं तुम्ही पाहिली असतील.
मुंबई : समाज्यात एक्स्ट्रा मॅरेटीअल अफेअरच्या अनेक प्रकरणं तुम्ही पाहिली असतील. विवाहबाह्य संबंध असतानाही अनेक पत्नी आपल्या धोकेबाज, प्रतारणा करणाऱ्या पतीला माफ करतात किंवा काही कारणास्तव त्यांना तसे करावे लागते. मात्र एखादा पुरुष अशा प्रकरणात माफ करण्याचा निर्णय घेण्याचे प्रमाण अगदी नगण्य आहे. पण स्त्रिया असा निर्णय का घेतात? त्यामागे नेमका विचार काय असतो? तर ही आहेत कारणे... यामुळे महिला आपल्या धोकेबाज पतीला माफ करतात...
सामाजिक दबाव
नवऱ्यापासून वेगळे झालेल्या स्त्री ला अजूनही आपल्या समाज्यात आदराने वागवले जात नाही. याउलट नवरा त्रास देत असतानाही त्याच्या सोबत संसार करणाऱ्या स्त्री कडे सहानभूतीने पाहिले जाते, तिला संस्कारी, पारंपारिक स्त्री चे स्थान दिले जाते. त्यामुळे अनेक स्त्रिया धोकेबाज पतीला माफ करुन पुन्हा त्याच्यासोबत संसार करतात. समाज्यात होणारी बेईज्जत टाळण्यासाठी देखील माफ करण्याचा निर्णय घेतला जातो.
प्रेमापुढे हतबल
आपल्या पत्नीवर प्रेम आहे तरी देखील बाहेरही अफेअर करणारे अनेक पुरुष आहेत. अशावेळी जर पतीने माफी मागितली आणि हे नाते तोडायचे न तोडण्याचे, मनापासून प्रेम करण्याचे वचन दिल्यास सर्व विसरुन स्त्रिया पुढे जाण्याचा विचार करतात.
मुलांच्या भविष्यासाठी
अनेकदा आपल्या मुलांच्या भविष्याचा विचार करुन अनेक स्त्रिया धोकेबाज पतीला माफ करण्यास हतबल होतात. मुले असणाऱ्या स्त्रियांना वाटते की, त्यांच्या नात्यात फूट पडल्यास त्याचा परिणाम मुलांवर होईल. म्हणून अनेक स्त्रिया माफ करण्याचा मार्ग निवडतात.
निस्समी प्रेम
अनेकदा काही पत्नी आपल्या पतीवर निस्समी प्रेम असते. त्याच्याशिवाय राहण्याचा त्या विचारच करु शकत नाही. अशावेळी त्या पतीने धोका दिला तरी त्याला माफ करतात.