मुंबई : अनेकजणांना सकाळी उठल्यानंतर सतत शिंका येतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण हा त्रास होण्यामागे अनेक कारणं असू शकतात. पण हा त्रास नेमका का होतोय ? हे जाणून घेतलं तर त्यावर उपाय करणं सोप्प होतं. मग डॉ सुबत्रा दास यांनी सतत शिंका येण्यामागील सांगितलेली ही कारणं वेळीच जाणून घ्या. 


सतत येणार्‍या शिंका तुम्हांला भविष्यात सर्दीचा त्रास होतोय याचे संकेत देतात. त्यामुळे अचानक शिंकांचा  त्रास होत असेल आणि वातावरणात थंडावा, अचानक बदल झाला नसेल तर सर्दी होणार असल्याचा इशारा वेळीच ओळखा.  


 अचानक थंड वातावरणातून उष्ण वातावरणात गेल्यास शिंकांचा त्रास होऊ शकतो. अनेकदा एसी रूममधून बाहेर पडल्यास हा त्रास होऊ शकतो. वातावरणात चटकन झालेल्या बदलामुळे शिंकांचा त्रास होतो. 
 
 तुमच्या अवतीभवती धुम्रपान करणारी व्यक्ती असेल तर तर सिगारेटच्या धुरामुळेही तुम्हांला त्रास होऊ शकतो. सिगारेटचा धूर नाकाला त्रासदायक ठरतो. त्यामउळे सतत सिगारेट पिण्याची इच्छा होणारी व्यक्ती तुमच्या आसपास असेल तर तुम्हांला सतत शिंका येऊ शकतात. 
 
 सिझनल अ‍ॅलर्जीमुळेदेखील खोकला, शिंका, डोळे लाल होणं असा त्रास होतो. अशावेळेस तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
 
 तुम्हांला मांजरी किंवा कुत्र्याची अ‍ॅलर्जी असेल तर त्यामुळे शिंकण्याचा त्रास होतो. त्यांच्या अंगावरील केस त्रासदायक ठरू शकतात.