Risk of Reusing Cooking Oil: तेलकट पदार्थ भारतात खूप आवडीने खाल्ले जातात. घरी किंवा बाहेर तळलेले पदार्थ खायला अनेकांना आवडतात. यामध्ये समोसे, पुरी, फ्रेंच फ्राईज, छोले भटुरे, कचोरी, स्प्रिंग रोल, टिक्की यासारख्या पदार्थांचा समावेश आहे. जेव्हा आपण एखादा पदार्थ तळतो तेव्हा बर्‍याच वेळा पॅनमध्ये किंवा कढईत तेल उरते. त्या तेलाचा अपव्यय टाळण्यासाठी आपण पुन्हा वापरतो. मात्र तेल पुन्हा गरम करणे, धोकादायक आहे. यामुळे आपल्या शरीरास हानी पोहोचू शकते. GIMS हॉस्पिटल, ग्रेटर नोएडा येथे कार्यरत असलेल्या प्रसिद्ध आहारतज्ञ डॉ. आयुषी यादव यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पेज 'द पॉवर ऑफ हेल्थ' द्वारे सांगितले की, स्वयंपाकाचे तेल पुन्हा पुन्हा गरम केल्याने काय तोटे आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तेल पुन्हा गरम करण्याचे तोटे


जर तुम्ही स्वयंपाकाचे तेल पुन्हा पुन्हा वापरत असाल, तर असं केल्याने त्यात टॉक्सिक पदार्थ तयार होऊ लागतात. असे पदार्थ सेवन केल्यास शरीराला खूप नुकसान होऊ शकते. खरं तर, खाद्यतेल पुन्हा वापरल्याने शरीरात फ्री रेडिकल्सची समस्या वाढते, ज्यामुळे शरीरात जळजळ होते.


1. कर्करोगाचा धोका


स्वयंपाकाचे तेल पुन्हा गरम केल्याने भविष्यात कॅन्सर सारख्या घातक आणि प्राणघातक आजाराचा धोका वाढतो. कारण त्यामुळे शरीरात जळजळ वाढू लागते आणि त्यामुळे कर्करोग होतो.


2. उच्च रक्तदाबाची तक्रार


जेव्हा स्वयंपाकाचे तेल जास्त गरम केले जाते तेव्हा त्याची रासायनिक रचना बदलू लागते आणि तेल फॅटी ऍसिड आणि रॅडिकल्स सोडते. हे तेल नंतर उच्च रक्तदाबाचे कारण बनते.



3. हृदयविकाराची भीती


उच्च तापमानात तेल वारंवार तापवल्याने एक विचित्र प्रकारचा धूर निघतो. ते खराब कोलेस्टेरॉलचे कारण बनतो. यामुळे हृदयविकाराचा झटका, पक्षाघात आणि छातीत दुखणे होऊ शकते.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. कृपया ती अवलंबण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या. याची पुष्टी ZEE 24 TAAS करत नाही.)