Remedies for Dark Neck: सुंदर दिसायला कोणाला आवडत नाही ? प्रत्येकालाच सुंदर सर्वात वेगळं दिसायचं असत महिला वर्गात तर याची विशेष रुची असते यासाठी परळमध्ये जाणं असो किंवा मग वेगवेगळे DIY सुंदर मी होणार, असं म्हणत अनेकजण घरच्या घरी, घरातल्याच साहित्यानं सौंदर्य आणखी खुलवण्याचं काम करतात. पण बऱ्याचदा काही गोष्टी सौंदर्यात बाधा आणतात . त्यापैकी एक गोष्ट म्हणजे काळवंडलेली मान... काही जणांची मान फारच काळी  झालेली असते ते स्वतः बरेच प्रयत्न करून पाहतात मात्र तरीही मानेवरचा काळपट थर जाता जात नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

(Neck) मान नियमित स्वच्छ न केल्यास काळवंडण्यास सुरुवात होते. यासाठी सध्या बाजारात अनेक स्क्रब आणि इतर साहित्य उपलब्ध आहेत. पण, त्यानंही काहीजणांना फरक पडत नाही. अशावेळी मग घरच्या घरी असणाऱ्या साहित्याकडे मोर्चा वळवला जातो. बऱ्याचदा काही घरगुती उपाय अनपेक्षित परिणाम दाखवतात. 


 तांदळाचा वापर (use rice)


सौंदर्य तज्ज्ञांच्या (Beauty Experts) माहितीनुसार मानेवर Dead Skin जमल्यामुळं ती काळी पडण्यास सुरुवात होते. अनेकदा शरीरात पाण्याची कमतरता असल्यामुळंही मानेवर टॅन (tan) जमा होतो. यासाठी तांदळाचं पाणी आणि तांदळाची पेस्ट बरीच मदत करते. 


कशी स्वच्छ कराल मान? (how to clean neck)


(Rice Water) तांदळापासून मान स्वच्छ करण्यासाठी झोपण्यापूर्वी तांदूळ पाण्यात भिजवा आणि सकाळी उठल्यानंतर ते वाटून घ्या. या (Rice Paste) तांदळाच्या पेस्टमध्ये 1 विटामिन-ई कॅप्सूल आणि 1 चमचा कॉफी  (coffee) मिसळा. (remedies for dark tan neck do this to remove black patch )


हे मिश्रण मानेवर लावा आणि 10 मिनिटं ठेवा, त्यानंतर धुवून स्वच्छ करा. यानंतर मानेवर हलक्या हातानं moisturizer लावा. असं केल्यास मानेचा काळवंडलेपणा कमी होईल. 


या गोष्टींची काळजी घ्या (precautions)


एक गोष्ट लक्षात घ्या, की हे मिश्रण मानेवर जोरजोरात चोळू नका. असं केल्यास मानेवरील त्वचेला इजा पोहोचेल. हे मिश्रण मानेवर जास्त वेळ सुकून देऊ नका. (remedies for dark tan neck do this to remove black patch )


शिवाय केसांच्या (Hairs) संपर्कातही हे मिश्रण न आलेलंच बरं. कारण ते केसात अडकल्यास काढताना बऱ्याच अडचणी येतात.