मुंबई : पोटाच्या चरबीप्रमाणे हातांवर खासकरून हाताच्या दंडावर चरबी जमा होऊ लागते. दंडावर चरबी जमा होण्यामागे अनेक कारणं असू शकतात. दंडावर चरबी जमा होण्याची समस्या स्त्रियांमध्ये दिसून येते. मात्र सध्या पुरुषंही याला अपवाद नाहीत. जर तुम्हीही या समस्येला तोंड देत असाल तर या 3 एक्सरसाइज तुम्हाला नक्कीच मदत करतील.


कशी कमी करावी हाताची चरबी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या हातांची चरबी कमी करण्यासाठी तुम्हाला खाण्यावर बंदी घालण्याची गरज नाही. उलट काही प्रभावी व्यायाम नियमितपणे केल्याने ही समस्या दूर होण्यास मदत होईल. हे व्यायाम तुम्ही घरीही सहज करू शकता.


ट्राइसेप्स पुश-बॅक


हातांची म्हणजे दंडावरची चरबी कमी करण्यासाठी ट्रायसेप्स पुश-बॅक व्यायाम खूप प्रभावी आहे. हे करण्यासाठी तुम्हाला दोन डंबेल्सची आवश्यकता असेल. तुमच्या क्षमतेनुसार, दोन्ही हातात डंबेल उचला. आता दोन्ही पाय एकत्र जोडा आणि कंबर थोडी पुढे वाकवा. 


लक्षात ठेवा की यावेळी तुमची पाठ, मान आणि छाती एकदम सरळ आणि गुडघे थोडे वाकलेले असावेत. आता दोन्ही कोपर कंबरेला चिकटवा आणि हात मागे सरळ करा. आता डंबेल पुढे आणा आणि छातीजवळ आणा. 10 ते 12 वेळा ही पद्धत करा.


ट्राइसेप्स पंच-आउट


हातातील चरबी कमी करण्यासाठी ट्रायसेप्स पंच-आउट व्यायाम देखील फायदेशीर आहे. हा व्यायाम करण्यासाठी, डंबेलची देखील आवश्यकता असेल. तुम्ही वरील स्थितीत येऊन डंबेल उजव्या हातात धरून ठेवा. या व्यायामामध्ये, कंबरेऐवजी खांद्याच्या समोर उजवीकडे कोपर आणावं लागेल. आता डंबेलला बाहेरच्या बाजूने घेत कोपर सरळ करा आणि अशा प्रकारे या व्यायामाचे 10-12 रॅप्सचे 3 सेट करा.


चेयर डिप


हात म्हणजे दंडावरची चरबी कमी करण्यासाठी चेअर डिपचा व्यायाम केला जाऊ शकतो. यासाठी तुम्हाला एक खुर्चीची आवश्यकता आहे. आता तुम्ही खुर्चीला पाठ टेकून उभे रहा आणि दोन्ही तळवे खुर्चीच्या काठावर टेवा. यानंतर तुम्ही खुर्चीवर बसण्याच्या स्थितीत या, पण खुर्चीसमोर बसा. या व्यायामाचे 10-12 रॅप्सचे 3 सेट करा.