मुंबई : कोरोनाच्या गंभीर परिस्थितीमुळे ज्यांना शक्य आहे त्यांना वर्क फ्रॉ़म देण्यात आलं. या काळात कपल्सना एकमेकांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळाली. मात्र असं असून देखील शारीरिक संबंधाच्या बाबतीत कपल्सची इच्छा कमी झाल्याचा सेक्सोलॉजिस्टने दावा केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, की कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या भीतीमुळे लोक त्यांच्या पार्टनरशी शारीरिक संबंध ठेवण्यास घाबरू लागले आहेत. साथीच्या या संकटामध्ये बरेच लोक सोलो सेक्सकडे वळत आहेत. त्यांना अशी भीती आहे की त्यांच्या जोडीदाराशी शारीरिक संबंधांमुळे ते या प्राणघातक संसर्गाचा बळी पडतील. म्हणूनच असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही की गेल्या दीड वर्षात सेक्स लाईफमध्ये एक मोठा बदल झाला आहे.


द वीकच्या एक अहवालानुसार, तज्ज्ञ म्हणतात, सेक्सुअल रिस्पॉन्सची इच्छा, उत्तेजना आणि कामोत्तेजना यांच्यावर अललंबून असते. कोरोनाच्या काळात ताणतणाव, डिप्रेशन त्याचप्रमाणे सायकोसिसने लोकांमध्ये सेक्सची इच्छा कमी केली आहे. दरम्यान हे इरेक्टाईल डिस्फंक्शनचंही कारण बनू शकतं.


दरम्यान कोविड 19च्या लस आणि सेक्सुअल लाईफ यासंदर्भात लोकांच्या मनात अनेक गैरसमज दिसून आले. यामध्ये लोकांच्या मनात वॅक्सिन सेक्स ड्राईव्हवर परिणाम करेल किंवा लसीमुळे इन्फर्टिलीचा धोका उद्भवू शकतो अशा गैरसमजुती होत्या. काही काळापूर्वी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रलायाने याबाबत प्रेस रिलीज जारी करत कोरोना वॅक्सिन सुरक्षित असल्याचं सांगितलं होतं. 


कोरोनाच्या या संकटात लैंगिक इच्छा व्यवस्थित ठेवण्यासाठी तज्ज्ञांनी काही प्रकारच्या टिप्सही देल्या ​​आहेत. तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, जीवनशैलीत थोड्याश्या सुधारणा केल्यास लोकांना नक्कीच मोठा फायदा होईल. व्यक्तींनी रोजच्या आहारात हिरव्या भाज्या आणि फळांचा समावेश केला पाहिजे. तसंच प्रोटीन आणि फायबरयुक्त आहार घ्यावा. त्याचप्रमाणे व्यायामही नियमित केला गेला पाहिजे