मुंबई : सेक्श्युअल फ्रस्ट्रेशन म्हणजेच ताणतणावाबाबत तुम्ही यापूर्वी ऐकलं असेल. मात्र सेक्श्युअल फ्रस्ट्रेशन यासंदर्भात तुम्हाला काही कल्पना आहे का? सेक्श्युअल फ्रस्ट्रेशन म्हणजे लैंगिक जीवनामध्ये समाधानी नसल्याने व्यक्तीमधील चिडचिडेपणा वाढतो आणि तो अधिक चिडचिड करू लागतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सेक्श्युअल फ्रस्ट्रेशन म्हणजे एखाद्या व्यक्तीला लैंगिकदृष्ट्या ज्याची गरज आहे. मात्र त्यावेळेस ती व्यक्ती अनुभवत असलेल्या गोष्टींमध्ये असंतुलन असणं. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार ही एक नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. सेक्श्युअल फ्रस्ट्रेशन हे प्रत्येक व्यक्तीमध्ये विविध पद्धतीने दिसून येऊ शकतं. काही लोकांचं हे फ्रस्ट्रेशन रागाच्या माध्यमातून बाहेर पडतं. तर काहींमध्ये डिप्रेशन, ताणतणाव अशा प्रकारांमध्येही दिसून येतं.


अनेकांना यामुळे सेक्श्युअल लाईफमध्ये नैराश्य जाणवू लागतं. मात्र सेक्शुअल फ्रस्ट्रेशन आलंय हे कसं ओळखावं. यासाठी याची लक्षणं जाणून घेणं गरजेचं आहे. तर पाहूयात सेक्श्युअल फ्रस्ट्रेशनची लक्षणं


सतत चि़डचिड होणं


सेक्श्युअल फ्रस्ट्रेशनचा सामना करताना व्यक्तीचं शरीर विविध गोष्टींवर चित्र-विचित्र पद्धतीने प्रतिक्रिया देतं. यामुळे संबंधित व्यक्ती नाराज होऊन चिडचिडी होऊ शकते. सेक्स केल्याने ताणतणाव आणि चिंता कमी होण्यास मदत होते आणि आपला मूड देखील सुधारतो. व्यक्ती जर लैंगिक नैराश्याचा सामना करत असेल तर ती सेक्स केल्यानंतरही तणावात राहण्याची शक्यता असते. एकूणच त्या व्यक्तीची कोणत्याही गोष्टीवरून चिडचिड होते.


चिंता लागून राहणं


चिंताग्रस्त व्यक्तींना काही सवयी असतात. जसं की नखं चावणं, काही लोक केसांशी खेळतात, काही लोक पायांची हालचाल करू लागतात. पण जर या सवयी वाढल्या असतील तर आपण लैंगिक नैराश्याशी संबंधित समस्यांचा सामना करत आहात, हे लक्षात घ्या.


झोप न येणं


ज्या व्यक्ती सेक्श्य़ुअल लाईफमध्ये समाधानी नसतात त्यांना पुरेशी आणि शांत झोप मिळत नाही. लैंगिक समाधानानंतर लोकांना गाढ झोप येते. जर तुम्हाला पुरेशी आणि शांत झोप मिळण्यास त्रास होत असेल तर तुम्ही सेक्श्युअल फ्रस्ट्रेशनने ग्रस्त असण्याची शक्यता आहे.