Health News : पोटदुखी ही एक अतिशय सामान्य समस्या आहे. अनेक वेळा खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे पोटदुखी होऊ शकते. काही लोक पोटदुखीसाठी औषध घेतात किंवा जास्त त्रास झाला तर डॉक्टरकडे जातात. मात्र नुकतेच एक प्रकरण समोर आले आहे. ज्यामध्ये एका तरूणाच्या पोटात दुखू लागल्याने डॉक्टरकडे गेला होता.  त्याचा रिपोर्ट पाहून डॉक्टर आश्चर्यचकित झाले. डॉक्टरांनी तपासणी केली असता त्यांच्या पोटात स्टीलचा ग्लास अडकल्याचे दिसून आले. हे प्रकरण कुठे आहे आणि पोटात अडकलेल्या स्टीलच्या ग्लासचे काय झाले, याबद्दल आपण या सविस्तर जाणून घेऊया... (shocking news drunk indian man gets a steel cup removed from his stomach doctors surprised)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहे संपूर्ण प्रकरण


मिळालेल्या माहितीनुसार हे प्रकरण बिहारमधील बेतिया येथील आहे. यामध्ये मद्यधुंद अवस्थेत असलेल्या 22 वर्षीय तरूणाच्या काही दिवसांपूर्वी पोटात प्रचंड दुखत होते आणि गुदद्वारातून रक्त येऊ लागले होते. प्रकरणाचे गांभीर्य पाहून त्यांना तात्काळ पाटणा मेडिकल कॉलेज रुग्णालयात घेऊन गेले. डॉक्टरांनी त्याची तपासणी केली असता त्याच्या पोटात 14 सेमी (5.5 इंच) उंच ग्लास अडकल्याचे अहवालात समोर आले. तो शरीराच्या आत अडकला आणि तो तिच्या शरीरात गेला त्यामुळे त्याच्या गुदद्वारातून रक्त येऊ लागले.


अडीच तास ऑपरेशन


या शस्त्रक्रियेचे नेतृत्व करणारे डॉ. इंद्र शेखर कुमार यांनी सांगितले की, ही शस्त्रक्रिया 11 डॉक्टरांच्या पथकाने केली आणि शरीरातील स्टीलचा ग्लास यशस्वीपणे बाहेर काढला. तरूणाच्या शरीरातील ग्लास काढण्यासाठी कोलोस्टोमी करण्यात आली. ही एक शस्त्रक्रिया आहे ज्यामध्ये आतड्यात एक छिद्र केले जाते आणि एक पिशवी बसविली जाते. जेणेकरून जखम बरी होऊ शकेल. या शस्त्रक्रियानंतर काही दिवसातच त्या तरूणाला डिस्चार्ज दिला आणि जानेवारीत कोलोस्टोमी काढली जाईल. मुलगा दारूच्या नशेत असताना हा स्टीलचा ग्लास त्याच्या अंगात गेला असावा त्यामुळे त्याला काहीच आठवत नसल्याचा दावा डॉक्टरांनी केला आहे.


वाचा : Gold-Silver Price: दिवाळीच्या तोंडावर सोने-चांदी स्वस्त की महाग? जाणून घ्या नवे दर


काही काळापूर्वी ही बाब समोर आली होती


मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यातील एका व्यक्तीला मागील अनेक दिवसांपासून पाठदुखीचा त्रास होत होता. वेदना सहन न झाल्याने ते भिंडच्या जिल्हा रुग्णालयात गेले. रुग्णालयातील डॉक्टरांनी तिला रक्त तपासणी, अल्ट्रासाऊंड आणि एक्स-रे करण्यास सांगितले. अहवाल आल्यावर डॉक्टरही अवाक् झाले. त्या व्यक्तीच्या मूत्राशयात एक खिळा अडकला होता. त्यामुळे त्याचा त्रास खूप वाढला होता. असे या अहवालात समोर आले आहे. तो खिळा जवळपास वर्षभर त्याच्या मूत्राशयात अडकला होता.