Beer Side Effects: बियर पिणाऱ्यांनो.. आत्ताच व्हा सावध, मर्दानगी संपली तर रडत बसाल
Beer Side Effects: जास्त प्रमाणात बियर घेतल्याने पुरुषांच्या सेक्स हार्मोन्सवर (Sex Hormones) परिणाम होतो. या संशोधनानुसार...
Beer Side Effects: मद्यपान करणं शरिरीसाठी घातक आहे, असं वडिलधाऱ्यांकडून सांगण्यात येतं. आजकाल तरुणाईमध्ये बियरचं (Beer) वेड आहे. मुल असो किंवा मुली आवडीने बियर पितात. भारतातील सुमारे 30 टक्के लोक बिअर पिण्याचे शौकीन आहेत. भारतीय लोकांना वाईनपेक्षा (Wine) जास्त बियरमध्ये जास्त रस आहे. बियर पिल्याने कोलेस्ट्रॉलसह (cholesterol) इतर गोष्टींवर होतो, असं म्हणतात. मात्र, त्याचा थेट परिणाम तुमच्या लैंगिकतेवर (Sexuality) होतो, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
बियर पिल्याने सेक्स हार्मोन्सवर परिणाम - (Effects of drinking beer on sex hormones)
नुकत्याच झालेल्या एका संशोधनात असा दावा करण्यात आलाय की, जास्त प्रमाणात बियर घेतल्याने पुरुषांच्या सेक्स हार्मोन्सवर (Sex Hormones) परिणाम होतो. या संशोधनानुसार बिअरच्या अतिसेवनाने पुरुषांची वडील बनण्याची क्षमता 50 टक्क्यांनी कमी होते, असा धक्कादायक खुलासा करण्यात आलाय.
जी लोकं सतत बियरचं सेवन (Drinking beer) करतात त्यांच्यामध्ये ही समस्या जाणवू लागते, त्यांच्या मेंदूच्या सर्व पेशी नष्ट होऊ लागलात. त्यामुळे एकाग्र मन लागत नाही. बिअरच्या अतिसेवनाने यकृतावर गंभीर परिणाम होतो. पचनशक्ती पूर्णपणे बिघडते. अहवालात समोर आलेल्या माहितीनुसार, जसं जसं बियर पिल्याने तुमचं पोट वाढत जातं. तसं तसं तुमच्या प्रजनन क्षमतेवर देखील परिणाम जाणवू लागतो.
आणखी वाचा - Beer Benefits: Beer चा एक ग्लास शरीरात गेल्यावर काय होतं माहितीय का? वाचून व्हाल चकित
दरम्यान, पुरूषांचं वजन वाढत जातं, तसं पोटाचा आकार वाढत जातो. दारूचे व्यसन (Addiction to alcohol) तसेच सिगारेटचे (cigarettes) व्यसन असते त्यांच्यासाठी त्यांचे स्पर्म काऊंट्स (sperm counts) कमी होण्याची शक्यता आहे. रात्री कमी झोप लागल्यानं पुरूषांच्या शरीरातील स्पर्म कांऊट (Sperm Count and Health) कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ताणामुळेही पुरूषांच्या आरोग्यात बदल होतात, त्यामुळे जास्त ताण घेऊ नका, असा सल्ला डॉक्टर देत असतात.