Soybean Benefits And Side Effects : सोयाबीन हा व्हेज पदार्थ आहे. विशिष्ट चवीमुळे हा नॉनव्हेजला टक्कर देतो. म्हणूनच सोयाबीन हे व्हेज मीट म्हणूनही ओळखले जाते. सोयाबीन प्रथीनांचा खजिना आहे.  सोयाबीनच्या सेवनाचे आरोग्यदायी फायदे आहेत. मात्र, सोयाबीनचे अती सेवन आरोग्यासाठी हानीकारक ठरु शकते. सोयाबीन हे पुरुषांसाठी अधिक नुकसानदायक ठरु शकते. यामुळे पुरुषांच्या शरीरात महिलांसारखे बदल होतात. 


हे देखील वाचा... व्हेज म्हणून खाल्ल्या जाणाऱ्या 'या' लोकप्रिय भाजीचे सत्य समजल्यावर बसेल धक्का


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोयाबीनचे सेवन शरीरासाठी अत्यंत लाभदायी आहे. नॉनव्हेज न खाणाऱ्यांसाठी सोयाबीन हा सर्वोत्तम पर्याय आहे. अंडी आणि चिकनपेक्षासुद्धा सोयाबीनमध्ये जास्त प्रोटीन्स असतात. सोयाबीनमध्ये फायबर, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, जस्त, तांबे, मॅंगनीज, सेलेनियम, थायामिन, रिबोफ्लेविन, व्हिटॅमिन बी 6, फोलेट सारखे प्रोटीनयुक्त  घटक मोठ्या प्रमाणात असतात. यामुळेच सोयाबीन हे सुपरफूड म्हणूनही ओळखले जाते. 


सोयाबीन खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल, रक्तदाब आणि रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते. याशिवाय, हाडांच्या मजबूतीसाठी देखील फायदेशीर  सोयाबीनमध्ये शरीरातील एलडीएल म्हणजेच बॅड कोलेस्ट्रॉल 4 ते 6 टक्के कमी करण्याची क्षमता आहे. 


सोयाबीनचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम


सोयाबीन प्रोटीनचा एक चांगला सोर्स असला तरी याचे आरोग्यावर काही भयानक दुष्परिणाम देखील होतात. सोयाबीन खाल्याने महिलांमध्ये हॉर्मोनसंबंधी अनेक समस्या जाणवू शकतात. पुरुषांच्या शरीरावर तर याचा अधिक वाईट परिणाम होतो. मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे सेवन केल्यामुळे पुरुषांमधील स्पर्मच्या संख्येमध्ये कमतरता येते.  सोयाबीनच्या सेवनाने पुरुषांमध्ये इस्ट्रोजेन हार्मोनचे प्रमाण वाढवते. अशा प्रकारचे हार्मो हे प्रामुख्याने महिलांमध्ये असताता. या हार्मोनमुळे  पुरुषांच्या शरीरात महिलांच्या शरीरात होतात तसे बदल होतात. काही केसेसमध्ये पुरुषांच्या स्तनांचा आकार वाढतो.  प्रजनन क्षमता संपुष्टात येण्याची भिती असते. 
यासह थायरॉईडचा त्रास असलेल्या लोकांसाठी ते हानिकारक ठरू शकते.  बद्धकोष्ठता आणि अतिसाराचा धोका वाढू शकतो. यामुळे सोयाबीनचे सेवन हे प्रमाणातच करावे असा सल्ला दिला जातो. 
(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)