मुंबई : अनेकदा व्यक्तींना बोलताना विशिष्ट शब्द वारंवार वापरण्याची सवय असते. अमेरिकेत नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनानुसार असे काही शब्द समोर आलेत ज्यांचा उच्चार वारंवार होत असेल तर ती व्यक्ती तणावामध्ये आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रोसिडिंग ऑफ दी नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्सचे स्पीच एक्सपर्ट्च्या एका ग्रुपच्या मते ज्या व्यक्ती तणावात असतात त्यांच्या तोंडून रियली (really), सो (so) आणी वैरी (Very)हे शब्द वारंवार उच्चारले जातात. 


या संशोधनात १४३ लोकांच्या स्पीच पॅटर्नचे निरीक्षण करण्यात आले. यात सर्वांना एक व्हॉईस रेकॉर्डर देण्यात आला होता. दोन दिवस त्यांना हा रेकॉर्डर वापरायचा होता. सायकालॉजिस्टच्या मते एखादी व्यक्ती तणावामध्ये आहे हे ओळखण्यासाठी स्पीच पॅटर्न फायद्याचे ठरते.