Summer Tips : शरीराच्या `या` भागांवर लावा Perfume, दीर्घकाळ दरवळेल सुगंध
अशा पद्धतीनं परफ्यूम लावत नसाल तर आताच थांबा. ही योग्य पद्धत वाचा...
मुंबई : उन्हाळा सुरु झाल्यानंतर त्यामुळं शरीरातून घाम घळाघळा वाहू लागतो. कितीही नाकारलं तरीही शरीरावरचा घाम जेव्हा कोंदट वास सोडू लागतो तेव्हा आपणच या वासानं नाकं मुरडू लागतो. अशा वेळी डिओड्रंड, परफ्यूम किंवा मग अत्तर लावण्याला अनेकजण पसंती देताना दिसतात. (Summer Tips)
अनेकांची तक्रार असते की अमुक किंवा तमुक एक परफ्युम फार काळ टीकत नाही. पण, मुद्दा असा की तो लावण्याची पद्धतीच चुकच असेल तर ?
शरीराचे काही असे भाग आहेत जिथं परफ्यूम किंवा अत्तर लावल्यास त्यांचा सुगंध जास्त वेळासाठी दरवळतो. चला जाणून घेऊया परफ्यूम लावण्याची योग्य पद्धत.
मनगट- कोणत्याही कामासाठी हाताचा वापर सर्वाधिक होतो. अशामध्ये मनगटावर असणारं हे सुगंधी द्रव्य दरवळतं आणि हा सुगंध दीर्घकाळासाठी टीकून राहतो.
मान- शरीराच्या या भागावर परफ्यूम लावल्यास तो दीर्घकाळ टीकतो आणि यामुळं तुम्हाला अतिशय ताजंतवाणंही वाटतं.
छाती- उन्हाळ्यामध्ये सर्वाधिक गरम हे छातीच्या भागात होतं. अशा परिस्थितीमध्ये या भागात परफ्यूम लावणं उत्तम. पण, त्यासाठी आधी मॉइश्चरायझर लावावं आणि त्यानंतर परफ्यूम.
हाताचं कोपर- तुम्ही हाताच्या कोपरावरही परफ्यूम लावू शकता. फक्त इथं परफ्यूम स्प्रे करुन त्यानंतर तो हातांनी पसरवायचा. असं केल्याच हा सुगंध दीर्घकाळ टीकतो.
कपडे- शरीराच्या भागांव्यतिरिक्तही कपड्यांवर परफ्यूम स्प्रे केल्यास हा सुगंध अपेक्षेहून जास्त वेळासाठी दरवळतो.