मुंबई: शरीराला तंदुरूस्थ ठेवण्यासाठी योग अत्यंत प्रभावी. नियमित योग केल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य वाढते. आजकालच्या धावपळीच्या जिवनशैलीत तर, योगाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. तुम्ही शारीरिक आणि मानसिक त्रासांपासून दूर राहू इच्छित असाल तर, योग हा अत्यंत सोपा आणि फायदेशीर उपाय. म्हणूनच जाणून घ्या नियमित योगा करण्याचे फायदे.


तणावापसून मुक्ती


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नियमित योगा केल्याने मानसिक ताण तणाव कमी होण्यास मदत होते. सकाळी उठून तुम्ही जर प्राणायाम आणि मेडिटेशन करत असाल तर, पूर्ण दिवस तुम्हाला नक्कीच आनंद आणि उत्साही वाटेल.


वृद्धापकाळात आरोग्याच्या समस्या टाळण्यासाठी


आपण तरूण असतो. तरूण असताना प्रकृतीही साथ देत असते. त्यामुळे शरीर कोणत्याही किरकोळ तक्रारी, आजाराशी झुंजायला तयार असते. पण, जसजसे वय वढू लागते तसतसे शरीरावर मर्यादा येतात. पण, तुम्ही जर सुरूवातीपासूनच योगा करत असाल तर, तुमची ही साधना वृद्धापकाळात कामी येऊ शकते. वृद्धापकाळात आरोग्याच्या तक्रारी कमी होण्यसाठी नियमित योगा करा. 


शरीरातील साखर नियंत्रण


आजकाल कमी वयातही मधुमेहाची लागण झालेले अनेक लोक आपल्याला पहायला मिळतील. शरीरातील इन्सूलीनची निर्मिती होण्याचे प्रमाण घटले की शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते. अशा वेळी हे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी योगा महत्त्वाची भूमिका पार पाढतो.


वजन नियंत्रणासाठी महत्त्वाचे


वाढता स्थूलपणा हा तुमच्या कार्यक्षमतेवर मर्यादा घालतोच. पण, अनेक आजारांनाही निमंण देतो. म्हणून नियमित योगा करत चला. नियमित योगा करण्याने शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण नियंत्रणात राहते. परिणामी वाढत्या शारीरिक वजनाला मर्यादा पडतात. 


रक्ताभीसरण 


योगामुळे शरीराच्या सर्व अवयवांना चांगला व्यायाम मिळतो. त्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण वेगाणे होण्यास मदत होते. योगामुळे श्वासोच्छवास योग्य पद्धतीने घेतला जातो. त्यामुळे शरीरिरातील रक्ताभिसरण गतिमान होते. 


दरम्यान, नियमित योगा करण्याचे फायदे असे आकडेवारीने मुद्देसुद सांगता येत नाही. त्याला मर्यादा पडतात. पण, तुम्ही नियमित योगा करून योगाचे असंख्य फायदे स्वत: अनुभवऊ शकता.