आजकाल बदलत जाणाऱ्या जीवनशैलीचा विपरित परिणाम शरीरावर होत आहे. भेसळयुक्त आहारामुळे महिलांमध्ये मासिक पाळीच्या समस्येबरोबर आता स्तनाच्या कर्करोगाचं प्रमाण वाढत जात आहे. नुकतंच अभिनेत्री 'हिना खान' हिने तिला स्तनाचा कर्करोग झाल्याची माहिती सोशलमीडियावरुन दिली. त्यामुळे आता माध्यमांमध्ये 'स्तनाच्या कर्करोगा'विषयी आरोग्यविभागाकडून जनजागृती करण्यात येत आहे. गर्भाशयाच्या कर्करोगाप्रमाणेच आता स्तनाच्या कर्करोगाचं प्रमाण स्त्रियांमध्ये वाढत जात आहे. स्तनाचा कर्करोग होतो तरी कसा ? याची लक्षणं काय ते जाणून घेऊयात..

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'स्तनामधील पेशीं'ची प्रमाणापेक्षा जास्त वाढ झाली की, त्यांच्या 'गाठी' तयार होतात.या गाठींचं प्रमाण वाढलं की 'कर्करोग' होण्याची शक्यता जास्त असते. या गाठी तयार होण्याची विविध कारणं आहेत. वैद्यकीय अहवालानुसार, हा आजार काही प्रमाणात 'अनुवंशिक' असण्याची शक्यता जास्त असते. 'ब्रेस्ट कॅन्सर'ची ठोस कारणं अजून ही कळू शकली नसली तरी ,धावपळीचं आयुष्य,वेळेवर न जेवणं, अपुरी झोप आणि मानसिक ताण तणाव ही साधारण कारणं स्तनाचा कर्करोग होण्यास कारणीभूत ठरु शकतात असं सांगितलं जातं.  

स्तनाच्या कर्करोगाची लक्षणं कोणती ?
 


  • निप्पलमधून 'रक्तस्राव' होत असल्यास हे स्तनाच्या कर्करोगाचं लक्षण मानलं जातं.

  • स्तनांमध्ये 'गाठी 'तयार होतात आणि या गाठींमुळे जर कोणत्याही वेदना होत नसतील तर त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

  • जर एखाद्या महिलेची 'प्रसुती' झाली नसेल किंवा ती गरोदर नसाताना ही जर 'स्तनातून दूध' किंवा पाण्यासारखा 'स्त्राव' येत असेल तर हे कर्करोगाचं लक्षण आहे.

  • स्तनांचा आकार वाढत असल्यास हे 'ब्रेस्ट कॅन्सर'चं लक्षण आहे.

  • स्तनाचा 'आकार' वाढत जाऊन ते आतल्या बाजूने वळू लागत असतील दुर्लक्ष करु नये.



काय काळजी घ्यावी ?


  • वेळोवेळी दर 6 महिन्यांनी वैद्यकीय तपासणी करणं गरजेचं आहे.

  • स्तनाच्या कर्करोगाची लक्षणं जाणवत असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्याने BRCA1 आणि BRCA2 या कर्करोगाच्या चाचण्या करुन घ्या.

  •  शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करु नका.

  • स्तानाच्या कर्करोग हा 4 स्टेज मध्ये आढळतो. त्यामुळे वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.