मुंबई : बदलती जीवनशैली, ढासळलेली रोगप्रतिकारक शक्ती आणि निकृष्ट दर्जाचा आहार यांच्या एकत्रित परिणामामूळे ऍपेंडिक्सच्या रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. पाठीत, पोटात सतत दुखणे, भूक कमी लागणे, सतत उलटी आणि चक्कर येणे, बद्धकोष्ठता होणे, लघवी करताना वेदना होणे, थंडी वाजणे… ही ऍपेंडिक्सची लक्षणे असू शकतात. त्यामूळे वेळेतच काही घरगुती उपाय केल्यास ऍपेंडिक्सची शक्यता टळू शकेल. परंतू त्रास जास्त होत असल्यास डॉक्यरांचा सल्ला घेणे फार गरजेचे आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- सकाळी रिकाम्यापोटी तुळशीची काही पाने चावून खावी. पोटाचे विकार दूर होतात.


- जेवणाअगोदर एका पिकलेल्या टोमॅटोच्या फोडींवर सैंदव (काळे मीठ) मीठ घालून खावे. यामुळे काही दिवसांतच पोटदुखी आणि सूज यांपासून आराम मिळेल.


- दररोज दिवसातून कमीत कमी दोन वेळा आल्याचा चहा प्यावा. यामुळे ऍपेंडिक्समूळे होणारी वेदना आणि सूज कमी व्हायला मदत होते.


- पालक सूप किंवा पालकची भाजी खावी. यामुळे आतडय़ातील ऍपेंडिक्समुळे आलेली सूज कमी होते. 


- १ कप पाण्यात दोन चमचे मेथी घालून हे पाणी उकळवा. हे पाणी दिवसातून एकदा प्या. जेवणातही मेथीचा समावेश करा. यामुळे दुखणे, सूज कमी होईल.