Vitamin B12 Deficiency Symptoms: आपल्याला जेवणातून अनेक जीवनसत्वे मिळत असतात. त्यातीलच एक  महत्त्वाचे जीवनसत्वे म्हणजे बी 12. जर तुमच्या रोजच्या आहारात बी 12 ने समृद्ध असणाऱ्या पदार्थांचा समावेश नसेल तर, तुम्हाला अनेक सम्यांना सामोरे जावे लागू शकते. शरीरात बी 12 च्या कमतरतेमुळे स्ट्रोक, हृदयविकाराचा झटका, मज्जासंस्थेच्या संबंधीत समस्या आणि यासारख्या अनेक समस्या उद्भवू शकतात, ज्यामुळे निरोगी व्यक्तीही अंथरुणाला खिळतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशा गंभीर परिस्थितीमध्ये, व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेची लक्षणे ओळखणे गरजेचे आहे. आणि त्यावर लगेच उपाय करणेही खूप महत्वाचे आहे. रात्रीच्या वेळी बी 12 कमतरतेची अनेक गंभीर लक्षणे दिसून येतात. चला बघूया कोणती आहेत ही लक्षणे -


रात्री दिसणारी बी 12 च्या कमतरतेची 5 लक्षणे 


1. दिवसभर थकून रात्री झोपल्यानंतर शरीराच्या स्नायूंमध्ये वेदना जाणवतात. पण जर तुम्हाला या वेदना सारख्या होत असतील, रोज क्रॅम्प्स आणि स्नायूंमध्ये कमकुवतपणा जाणवत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. कारण हे व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेचे लक्षण असू शकते.


2. रात्रीच्या वेळी जर तुम्हाला पोट जास्त फुगणे किंवा पचनाशी संबंधित समस्यांचा त्रास होत असेल तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. मळमळ, अतिसार (डायरिया), गॅस, बद्धकोष्ठता यांसारखी गॅस्ट्रोइंटेस्टाइनल लक्षणे बी 12 ची कमतरता दर्शवत असू शकतात.


3. डोकेदुखी ही एक सामान्य समस्या आहे. तुम्हालाही हा त्रास नेहमीच होत असेल. पण जर रोज रात्री तुम्हाला डोकेदुखीचा त्रास होत असेल तर हे व्हिटॅमिन बी12 च्या कमतरतेचे लक्षणही असू शकते. हे लक्षात घेऊन डॉक्टरांचा सल्ला घ्या. 


4. आजकाल अनेक लोक निद्रानाशाच्या समस्येने त्रस्त आहेत. शरीरात बी12 ची कमतरता असल्यामुळेही झोप येत नाही. त्यामुळे जर तुम्हाला अनेक आठवड्यांपासून झोप येत नसेल, तर डॉक्टरांकडून तपासून घ्या.


5. झोपताना जर पायातील शिरा आपोआपच घट्ट होत असतील, तर तुमच्यासाठी याकडे दुर्लक्ष करणे त्रासदायक ठरू शकते. कारण अप्रत्यक्षपणे हे बी12 च्या कमतरतेचे लक्षण आहे. या संबंधीत डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करणे आवश्यक आहे. 


यातील काही लक्षणे जर तुम्हालाही जाणवत असतील तर त्याकडे दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)