एक्सरसाईज करायचा कंटाळा आला असेल तर `या` 3 एक्टिव्हिटी करा
तुम्ही काही सोप्या व्यायामाचा तुमच्या रोजच्या दिनक्रमात समावेश करू शकता.
मुंबई : दररोज व्यायाम करण्याचा कंटाळा येतोय. मात्र व्यायाम करणं टाळल्याने वजनात चढ-उतार तातडीने दिसून येतात. असं होऊ नये यासाठी आज आम्ही तुम्हाला काही टीप्स देणार आहोत. जर तुम्हाला काही कारणास्तव व्यायाम करता येत नसेल तर तुम्ही काही सोप्या व्यायामाचा तुमच्या रोजच्या दिनक्रमात समावेश करू शकता.
प्रत्येक तासाने 2 मिनिटांचा वॉक घ्या
जर तुम्ही बसून काम करत असाल तर तुम्ही तासाला किमान २ मिनिटं चालावं. तुम्ही ऑफिसमध्ये असलात तरी दर तासाला किमान 2 मिनिटं घड्याळ पाहून चाललं पाहिजे. जास्त वेळ बसल्याने तुमचं वजन वाढण्याची शक्यता असते.
दोरीच्या उड्या मारा
जर तुम्ही व्यायाम करत नसाल तर तुम्ही दोरीच्या उड्याही मारू शकता. दोरीने उडी मारून तुम्ही एका तासात सुमारे 400 कॅलरीज बर्न करू शकता. तुम्हाला प्रत्येक मिनिटाला 100 स्किप करावे लागतील. हृदयाच्या आजारांचा धोका टाळण्यासाठी, दोरीच्या उड्या मारणं फायदेशीर आहे.
जिने चढा
कुठेही जायचं असल्यास पायऱ्या चढून जाण्याच्या पर्याय निवडा. यामध्ये तुम्ही 300 ते 400 कॅलरीज बर्न करू शकता. जर तुम्ही 60 पायऱ्या चढलात तर तुम्ही पाय आणि नितंबांजवळी कॅलरी बर्न करू शकता. कॅलरी बर्न करून स्नायू मजबूत होतात. शिवाय पायऱ्या चढल्याने कोलेस्ट्रॉल कमी होते. वजन कमी करण्यासाठी हा सर्वोत्तम व्यायाम आहे.
स्टॅमिना वाढवतात या 3 एक्सरसाईज
स्टॅमिना वाढवण्यासाठी या एक्सरसाईजचा खूप फायदा होतो. तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, जर तुम्ही व्यायाम करत नसाल आणि या एक्सरसाईडचा तुमच्या दिनक्रमात समावेश केला तरच तुम्हाला मोठा फरक दिसेल. यामध्ये तुमची कॅलरी बर्न होतेच त्याचसोबत तुमची हाडंही मजबूत होतील.