मुंबई : कामाच्या ताणामुळे किंवा नात्यातील अस्थिरतेमुळे तुम्ही जर चिंतेत आहात का ? तर तुमचा ताण चेहऱ्यावर दिसू लागतो आणि तुमचा चेहरा उतरलेला दिसतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कारण जेव्हा तुम्ही तणावात असता तेव्हा शरीरातून cortisol स्त्रवतं. त्यामुळे शरीरातील मिठाचं प्रमाण कमी होवून शरीरात पाणी साचू लागतं आणि त्यामुळे चेहरा सुजलेला दिसतो. पण यासाठी तुम्ही चेहऱ्याला मसाज करू शकता. त्यामुळे चेहऱ्याची सूज कमी होईल आणि तुमचा ताण लोकांना दिसणार देखील नाही. जाणून घेऊया चेहऱ्याला मसाज करण्याची टेक्निक...


पहिली पायरी:


यासाठी तुम्हाला मॉइश्चरायझर आणि आय क्रीमची आवश्यकता आहे. हे प्रॉडक्टस फ्रीजमध्ये ठेवा. थंड झालेल्या प्रॉडक्टसमुळे चेहऱ्याची जळजळ, ताण दूर होण्यास मदत होईल. 


दुसरी पायरी:


त्यानंतर हातावर मॉइश्चरायझिंग क्रीम घेऊन हळुवार मानेला आणि गळ्याला लावा. या क्रीममुळे त्वचेची लवचिकता व पोत सुधारेल. 


तिसरी पायरी:


हातावर अजून थोडी क्रीम घेऊन चेहऱ्याला वरच्या दिशेने हळुवार मसाज करा. त्यामुळे जळजळ होण्यास करणीभूत ठरणारे घटक दूर होण्यास मदत होते. तसंच मसाज करताना कानाच्या मागे, कपाळावर हलकासा दाब द्या. 


चौथी पायरी:


बोटांनी डोळ्याच्या खाली असलेल्या नाजूक त्वचेवर हळुवारपणे आय क्रीम लावा. डोळ्यांच्या भोवती अनेक नर्व्हस असल्याने त्याजवळील त्वचेला हळुवार मसाज करा. 


पाचवी पायरी:


त्यानंतर डोळ्यांभोवती गोलाकार मसाज करण्यास सुरवात करा आणि डोळ्यांजवळील प्रेशर पॉंईटस प्रेस करा. त्यामुळे डोळ्यांभोवतालचा रक्तप्रवाह सुधारतो. सुजलेले डोळे, डार्क सर्कल्स, सुरकुत्या डोळ्यांच्या या समस्या दूर करण्यासाठी आय क्रीम फायदेशीर ठरते. 


म्हणून जर तुम्हाला कधी स्ट्रेस वाटले तर ५ मिनिटे काढा आणि मसाज करा. त्यामुळे तुम्ही रिलॅक्स व्हाल व चेहऱ्याला नवी झळाळी मिळेल. 


टीप: मसाज करताना तुम्ही सुगंधी मेणबत्त्या देखील लागू शकता. त्यामुळे स्पा मध्ये असल्यासारखे वाटेल व तुम्ही अधिक रिलॅक्स व्हाल.