तुमच्या घरातही 5 वर्षांपर्यंतचं बाळ असेल तर सावधान! `या` नव्या व्हायरसने वाढवली चिंता
भारतात एक नवा आजार आपले पाय पसरतोय. या आजाराची लागण झालेल्या मुलांना हाता पायावर, चेहऱ्यावर लाल टमाट्यासारखी फोडी येतात. तुम्ही या टॉमॅटो फ्लू बाबत ऐकलं असेलच. केरळ आणि ओडिशातून याच टोमॅटो फ्लूच्या अनेक केसेस समोर आलेल्या आहेत. मात्र लॅन्सेट जर्नलने आता याच टॉमॅटो फ्लू आणि भारताबाबत एक अत्यंत महत्त्वाचा रिपोर्ट सादर केला आहे.
Tomato Flu in India: भारतात एक नवा आजार आपले पाय पसरतोय. या आजाराची लागण झालेल्या मुलांना हाता पायावर, चेहऱ्यावर लाल टमाट्यासारखी फोडी येतात. तुम्ही या टॉमॅटो फ्लू बाबत ऐकलं असेलच. केरळ आणि ओडिशातून याच टोमॅटो फ्लूच्या अनेक केसेस समोर आलेल्या आहेत. मात्र लॅन्सेट जर्नलने आता याच टॉमॅटो फ्लू आणि भारताबाबत एक अत्यंत महत्त्वाचा रिपोर्ट सादर केला आहे.
टॉमॅटो फ्लूची पहिली केस ही केरळातरील कोल्लम मध्ये 6 मे रोजी समोर आली होती. यानंतर, आतापर्यंत 82 मुलांना याच टोमॅटो फ्लूची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. लॅन्सेटच्या माहितीनुसार लागण झालेल्या सर्व मुलांचं वय हे 5 वर्षांपेक्षा कमी होतं.
लॅन्सेटने आपल्या रिपोर्टमध्ये अत्यंत महत्त्वाची टिप्पणी केली आहे. सध्या आपण कोविडच्या चौथ्या लाटेचा सामना करतोय. मात्र अशातच एक नवीन व्हायरस आपले पाय पसरतोय. याला टॉमॅटो फ्लू नावाने संबोधलं जातंय. हा व्हायरस लहान मुलांमध्ये संक्रमित होतो.
या मुलांचं वय 5 पेक्षा कमी आहे. वयस्कर माणसांमध्ये या व्हायरसशी लढण्याची क्षमता जास्त असल्याने वयस्कर माणसांना हा आजार होणं दुर्लभ असल्याचंही लॅन्सेटमध्ये म्हंटलं आहे.
लहान मुलांच्या त्वचेवर टमाट्यांसारखे फोड
या व्हायरसचं संक्रमण झालेल्या मुलांच्या त्वचेवर टोमॅटोसारखे लहान फोड येतात. म्हणूनच याला टॉमॅटो फ्लू बोललं जातं. टोमॅटो फ्लू ची लागण झालेल्या मुलांना थकवा, मळमळ, उलटी, जुलाब, ताप, शरीरात पाण्याची कमतरता, यासारखी लक्षणं दिसतात. ओडिशातील 26 मुलांना या आजाराची लागण झाली आहे. टोमॅटो फ्लू ची लागण झाल्यानंतर डिहायड्रेशन, त्वचेवर लाल फोड येणं, खाज येणं येण्याची लक्षणं पाहायला मिळतात.
tomato flu increased tension in india lancet report now published