मुंबई : व्यक्ती तितक्या प्रकृती असतात. त्यामुळे कोणत्याही रिलेशनशिपमध्ये तुम्हांला समोरच्या व्यक्तीच्या स्वभावाप्रमाणे जुळवून घेणं अविभाज्य आहे. मुलींना समजून घेणं हे महाकठीण असं समजलं जातं. पण काहीवेळेस मुलींच्या 'अशा' स्वभावामुळे त्यांच्या बॉयफ्रेंडसाठी त्यांच्यासोबत रिलेशनमध्ये राहणं अवघड होऊ शकते. 'या' वयातील महिला अधिक रोमॅन्टिक !


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1. काही गर्लफ्रेंड कायम त्यांच्या बॉयफ्रेंडसोबतच राहणं पसंत करतात. बॉयफ्रेंड बाबत सतत पझेसिव्ह राहणं विशिष्ट टप्प्यानंतर कंटाळवाणं होते. नात्यामध्ये प्रत्येकाच स्वतःची स्पेस हवी असते. 


2. अनेक  मुली त्यांची चूक असुनही ती मान्य करत नाहीत. अशावेळेस नात्यामध्ये 'इगो' मोठा होतो. कायम चूकांवर पांघरूण घालणं शक्य नसल्याने अशा गर्लफेंड्सबाबत आयुष्य काढण्यापूर्वीच विचार करा. 


3. प्रत्येक लहान लहान गोष्टींवर रडणार्‍या मुलीदेखील बॉयफ्रेंडला एका विशिष्ट टप्प्यानंतर नकोशा वाटतात. सततचं रडगाणं त्यांच्या नात्यामध्ये निगेटिव्हिटी निर्माण करतात. 


4.हुकूमशाही स्वभावाच्या मुलीदेखील त्यांच्या बॉयफ्रेडसाठी त्रासदायक ठरतात. अशा मुलींना प्रत्येक वेळेस सार्‍या गोष्टी त्यांच्या मनाप्रमाणेच व्हाव्यात असे वाटत राहते. 


5. संशयी स्वभावाच्या मुलींसोबत कायम जुळवून घेणंदेखील मुलांना नकोशा वाटतात. क्षणाक्षणाची माहिती विचारणं, सतत फोन करणं, मोबाईल, ईमेल, सोशल अकाऊंट चेक करत राहणं त्यांना नकोसे वाटते. 


6. इमोशनली ब्लॅकमेल करणारी गर्लफ्रेंडदेखील मुलांना नको वाटतात. प्रत्येक गोष्ट त्यांच्या मनाप्रमाणे करण्यासाठी इमोशनली ब्लॅकमेल करणं भविष्यात त्यांना नुकसानकारक ठरते.