'या' वयातील महिला अधिक रोमॅन्टिक !

'रोमान्स'ला खरं म्हणजे वय नसतं.

Updated: Jun 20, 2018, 01:40 PM IST
'या' वयातील महिला अधिक रोमॅन्टिक ! title=

मुंबई : 'रोमान्स'ला खरं म्हणजे वय नसतं. वयाच्या कोणत्याही टप्प्यावर रोमॅन्टिक राहणं ही नात्यामध्ये सकारात्मकता टिकवून ठेवण्यास मदत करणारी एक भावना आहे. त्यामुळे 'रोमान्स'शिवाय आपलं आयुष्य अपूर्ण आहे. प्रत्येकालाच आपला साथीदार स्मार्ट, इमानदार आणि सोबतच रोमॅंटिक असावा असे वाटते. मात्र स्वभावानुसार प्रत्येकाचा रोमान्स व्यक्त करण्याचा मार्ग वेगळा असतो. 

महिला कधी असतात अधिक रोमॅन्टिक ?  

मुलींच्या मनातलं ओळखणं हे कठीण असतं असा काहींचा समज आहे. मात्र प्रत्यक्षात एका संशोधनाच्या अहवालानुसार, महिला वयाच्या 30-35 या टप्प्यावर अधिक रोमॅन्टिक असतात. याच टप्प्यात महिलांना शरीरासंबंध ठेवणंदेखील अधिक फायदेशीर आहे. तुमच्या पार्टनरला अधिक रोमँटिक करतील या टिप्स

लग्नाचे योग्य वय कोणते ? 

करियरच्या मागे धावणार्‍या मुलींना आजकाल नेमका लग्नाचा निर्णय कधी घ्यावा याबाबत मनात शंका असते. पण वयाच्या 25-30या वयात लग्न करणं फायदेशीर आहे. या काळात मुली शारिरीक आणि मानसिकरित्या अधिक सक्षम असतात. या ५ राशीचे पुरुष अधिक रोमांटिक असतात!

आई होण्याचं वय कोणते ? 

शारिरीक आणि मानसिक सक्षमता पाहता, वयाच्या 35शी पूर्वी आई होण्याचा निर्णय घेणं अधिक फायदेशीर आहे.