`ही` सुकलेली पानं करतील Uric Acid ला फिल्टर, असा करा त्यांचा उपयोग
Uric Acid Remed : शरीरात यूरिक ॲसिड वाढल्यास आरोग्याशी संबंधित अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे हे युरिक ॲसिड वेळीच कमी करणे असून तुम्ही घरगुती उपाय करु शकता. तुमच्या किचनमधील ही सुकलेली पानं संधीवातासाठी फायदेशीर ठरु शकते.
Uric Acid Remed : संधीवाताची समस्या ही सर्वसाधारण झाली असली तरी शरीरातील यूरिक ॲसिड वाढल्यास अनेक आजारांचा सामना करावा लागतो. आहारात जास्त प्रमाणात युरिकयुक्त पदार्थ झाल्यास आपल्याला Uric Acid ची समस्या जाणवते. यामुळे गुडघे आणि सांध्या दुखी होते. कारण इथे युरिक ॲसिडचे क्रिस्टल्स जमा होऊ लागतात आणि त्यामुळे आपल्याला सांधेदुखीचा त्रास सुरु होतो. पण आपल्या किचनमधील काही पदार्थ हे युरिक अॅसिड कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतं. आयुर्वेदिक उपायानुसार तमालपत्र किंवा तेजपान हे शरीरातील यूरिक अॅसिड फिल्टर करण्यास फायदेशीर ठरतं.
यूरिक अॅसिडमध्ये तमालपत्र किती फायदेशीर?
आयुर्वेदानुसार तमालपत्र यूरिक अॅसिडची पातळी कमी करण्यास फायदेशीर ठरतं. खरं तर तेजपानमध्ये असलेलं संयुगे यूरिक अॅसिडचे उत्पादन कमी करतं आणि शरीरातून त्याचं उत्सर्जन वाढण्यास मदत करतं. त्याशिवाय दाहक-विरोधी गुणधर्म संधीरोगाची लक्षणे कमी करण्यास मदतगार ठरतं. तसंच तमालपत्राच्या सेवनामुळे लघवीचे प्रमाण वाढतं. त्यामुळे शरीरातील अतिरिक्त द्रव बाहेर काढण्यास फायदेशीर ठरतं.
तमालपत्र किंवा तेजपत्राचं सेवन कसं करायचं?
आयुर्वेदानुसार युरिक अॅसिडचं प्रमाण कमी करण्यासाठी एका भांड्यामध्ये 1-2 कप पाणी घ्या. त्यात 2-3 तमालपत्र टाका आणि हे पाणी जवळपास 10-15 मिनिटे उकळून घ्या. आता या पाण्याचे दिवसातून दोनदा सेवन करा. त्याशिवाय तुम्ही 1-2 तमालपत्र पावडर एक कप दह्यात मिसळून त्याचं सेवन करु शकता. त्यासोबत स्वयंपाक करताना सूप किंवा करीमध्ये 1-2 तमालपत्र आवश्यक घाला.
हेसुद्धा वाचा - दररोज सकाळ - संध्याकाळी खा 'या' काळ्या बिया, नसांमधील Bad Cholesterol कमी होऊन Good Cholesterol वाढण्यास होईल मदत
'या' गोष्टीची काळजी घ्या!
आरोग्य तज्ञांच्या म्हणण्यानुसार, तमालपत्र वापरण्यापूर्वी गर्भवती महिलांनी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. तसंच तुम्हाला मूत्रपिंडाच्या आजारासारखी समस्या असेल तर तमालपत्र वापरण्यापूर्वी डॉक्टरांना नक्की संपर्क करा.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)