दररोज सकाळ - संध्याकाळी खा 'या' काळ्या बिया, नसांमधील Bad Cholesterol कमी होऊन Good Cholesterol वाढण्यास होईल मदत

How to Increase Good Cholesterol : तुम्हाला नसांमध्ये जमा झालेले वाईट कोलेस्ट्रॉलचा नाश करुन चांगलं कोलेस्ट्रॉलच प्रमाण वाढवायच आहे. तर या काळा बियांचं सेवन दररोज सकाळ संध्याकाळी केल्यास फायदा मिळेल.   

नेहा चौधरी | Updated: May 27, 2024, 09:48 AM IST
दररोज सकाळ - संध्याकाळी खा 'या' काळ्या बिया, नसांमधील Bad Cholesterol कमी होऊन Good Cholesterol वाढण्यास होईल मदत title=
Eat chia seeds every morning and evening Bad Cholesterol in the veins disappears Good Cholesterol will increase

How to Increase Good Cholesterol in Marathi : गेल्या काही वर्षांमध्ये कोलेस्ट्रॉलची समस्या सामान्य बाब झाली आहे. जेव्हा मानवी शरीरातील नसांमध्ये खराब कोलेस्ट्रॉल वाढत तर बीपी आणि हृदयविकाराचा धोका निर्माण होतो. त्यामुळे खराब कोलेस्ट्रॉलचा नाश करुन चांगल कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढवणे हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय गरजेच आहे. अशात आयुर्वैदात घरगुती उपाय सांगण्यात आले आहे. काळा बिया म्हणजे चिया सिड्स या खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात. तुम्ही चिया सिड्सचं सेवन दुधासोबत केल्यास खराब कोलेस्टेरॉल विरघळण्यास मदत मिळते. चला मग जाणून घ्या खराब कोलेस्ट्रॉलमध्ये दूध आणि चियाच्या बियांचे सेवन करणे कसं फायदेशीर आहे. (Eat chia seeds every morning and evening Bad Cholesterol in the veins disappears Good Cholesterol will increase)

1. फायबर समृद्ध 

चिया सिड्स दुधात भिजवल्यास त्यातील फायबरचे प्रमाण वाढण्यास मदत मिळते. या दुधाचं सेवन केल्यास रक्तवाहिन्या साफ होतात. हे तुमच्या रक्तवाहिन्या स्क्रबप्रमाणे स्वच्छ करतात आणि रक्ताभिसरण सुधारण्यास मदरगार ठरतं. यामुळे खराब कोलेस्ट्रॉलची समस्या कमी होऊन हृदयविकाराचा धोका टाळतो. 

हेसुद्धा वाचा - 'या' तेलामुळे Bad Cholesterol वाढत, ICMR म्हणतं तेल फायदेशीर पण हृदयसंबंधित आजारांची भीती

2. चांगले कोलेस्ट्रॉल वाढवते

दूध आणि चिया सिड्सचं सेवन केल्यास तुमच्या शरीरात चांगले कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते. त्याशिवाय चिया बियांमध्ये ओमेगा -3 हे निरोगी चरबी, रक्तवाहिन्यांसाठी आणि त्यांच्या भिंतींच्या आरोग्यासाठी निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर ठरते.

हेसुद्धा वाचा - Uric Acid Remedy : 'या' 2 बिया करतात युरिक अ‍ॅसिडचा नाश, सकाळी रिकाम्या पोटी त्यांचं पाणी पिऊन किडनी ठेवा निरोगी

3. ट्रायग्लिसराइडची पातळी कमी करते

दूध आणि चिया सिड्स खराब कोलेस्टेरॉलमधील ट्रायग्लिसराइडची पातळी कमी करते. हे ट्रायग्लिसराइड्स साफ करते आणि रक्तवाहिन्या निरोगी ठेवण्यास चिया सिड्स उपयुक्त ठरतं. चिया सिड्समधील फायबर हे प्रामुख्याने विरघळणारे फायबर आणि म्युसिलेज असून एक चिकट पोत तयार करतो. हे तंतू एलडीएल कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइडची पातळी कमी करण्यास उपयुक्त ठरेल. त्यामुळे या सर्व कारणांमुळे खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी तुम्ही दूध आणि चिया सिड्सचं सेवन दररोज करायला पाहिजे. 

(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)