health News: आपले आरोग्य अनेक आजारांनी त्रासलेले असते. काही आजारांची लक्षणे स्पष्टपणे दिसतात अथवा जाणवतात. मात्र तुम्हाला माहित आहे तुमच्या लघवीच्या रंगवरुनही तुमचे आरोग्य कसे आहे किंवा तुम्हाला कोणता आजार आहे का ते ओळखता येते. लघवीचा रंग हा नेहमीच बदलत असतो. लघवीच्या रंगावरून (Urine color) आपल्याला नेमका काय आजार झाला आहे याची डॉक्टरांना कल्पना येते असे तज्ञ्यांचे म्हणणे आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लघवीचा रंग जितका गडद असेल तितका शरीरातील आजारांचा अधिक धोका असतो. डिहायड्रेटेड (Dehydrated) असताना लघवीचा रंग खूप गडद आणि हलका तपकिरी असतो. तर कधी काही गोष्टी खाल्ल्याने आणि औषधांमुळे लघवीचा रंग बदलतो हे तुम्ही अनेकदा पाहिले असेल. अनेक वेळा लघवीचा रंग आपल्या आरोग्याशी निगडीत अनेक गोष्टी सांगत असतो. चला तर पाहूया काय सांगतात हे रंग  


पारदर्शक रंग- जर तुमचा लघवी पारदर्शक रंगात (Urine is transparent in color) दिसत असेल तर याचा अर्थ तुम्ही जास्त प्रमाणात पाणी पिता.  हायड्रेटेड राहणे ही चांगली गोष्ट आहे. परंतु जास्त पाणी पिल्याने तुमच्या शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स (Electrolytes) कमी होऊ शकतात. पाणी पिण्याचे प्रमाण अधिक असेल तर सिरोसिस आणि व्हायरल हेपेटायटीस सारख्या यकृत समस्या देखील सूचित करू शकते.


हलका पिवळा ते गडद पिवळा रंग- युरोक्रोम पिगमेंटमुळे (Eurochrome pigment) लघवीचा रंग हलका पिवळा ते गडद पिवळा दिसतो. जेव्हा तुम्ही पाणी पितात तेव्हा हे रंगद्रव्य पातळ होते. शरीरातील हिमोग्लोबिनचे (Hemoglobin) विघटन झाल्यामुळे युरोक्रोम तयार होतो. काहीवेळा रक्तातील व्हिटॅमिन डीचे प्रमाण जास्त असल्याने लघवी निऑन रंगातही दिसते.


लाल आणि गुलाबी रंग - लघवीचा लाल आणि गुलाबी रंग तुम्ही काय खाल्ले यावर अवलंबून असतो. पण लघवीचा हा रंग वाढलेला प्रोस्टेट, किडनी स्टोन, मूत्राशय (prostate, kidney stones)किंवा किडनीमधील गाठ इत्यादी अनेक आजारांमुळे देखील असू शकतो. परंतु अनेकवेळा तुम्ही गडद लाल आणि गुलाबी रंगाची एखादा पदार्थ खाल्यामुळे ही  लघवीही लाल आणि गुलाबी दिसतो.


वाचा: 37 वस्तू आणि तिचे 35 तुकडे... क्रूरकर्मा अफताबचा हैवानी प्लान 


केशरी किंवा ऑरेंज रंग - यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता तसेच मिठाची मात्रा अधिक झाल्याचे समजावे. कधी कधी हे काविळीचेदेखील लक्षण मानले जाते.


निळ्या आणि हिरव्या रंग - लघवीचा निळा आणि हिरवा रंग तुम्ही काही खाल्ल्याने होऊ शकतो. मिथिलीन ब्लू नावाचा रंग अनेक कँडीज आणि काही औषधांमध्ये वापरला जातो. ज्यामुळे तुमच्या लघवीचा रंग निळा दिसू शकतो. परंतु या रंगाचे मूत्र मूत्रपिंड आणि मूत्राशयाशी संबंधित रोग देखील सूचित करते. स्यूडोमोनास एरुगिनोसा बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे, तुमच्या लघवीचा रंगही निळा, हिरवा किंवा जांभळा दिसू शकतो.


गडद तपकिरी मूत्र- अनेक प्रकरणांमध्ये, मूत्राचा गडद तपकिरी रंग निर्जलीकरण दर्शवतो. कधीकधी औषधांच्या दुष्परिणामांमुळे लघवीचा रंग गडद तपकिरी दिसू शकतो. गडद तपकिरी रंगाचे मूत्र देखील यकृताशी संबंधित रोग सूचित करते. लघवीमध्ये पित्ताचा रस मिसळल्यानेही अनेक प्रकरणांमध्ये असे घडते. 


लघवीचा वास येणे - लघवीला येणारा वास हादेखील आजारांसंदर्भातील तसेच शरीरातील बदलांसंदर्भातील सूचना देत असतो. हिरव्या भाज्यांचे अतिसेवन केल्याने लघवीचा वास बदलतो, लघवीत संसर्ग झालेला असेल तर वासाची तीव्रता वाढते, लघवीतून गोड वास येत असेल तर ते मधुमेहाचे लक्षण मानले जाते, बरेचदा अँटिबायोटिक्स घेतल्यामुळेही लघवीचा रंग आणि वास यांवर परिणाम होतो.