अंडर आर्म्सचे रॅशेश दूर करण्याचे सोपे उपाय
अंडर आर्म्सची त्वचा ही अत्यंत मऊ तितकीच नाजूक असते. त्यामुळे त्या ठिकाणी घामामुळे किंवा पावसात भिजल्यावर कपडे ओले झाल्यामुळे इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. अशा वेळी खाज, लागसरपणा, जखमा होण्यापासून वाचण्यासाठी तसेच अअंडर आर्म्सचे रॅशेश घालवण्यासाठी करा हे घरगुती उपाय.
मुंबई : अंडर आर्म्सची त्वचा ही अत्यंत मऊ तितकीच नाजूक असते. त्यामुळे त्या ठिकाणी घामामुळे किंवा पावसात भिजल्यावर कपडे ओले झाल्यामुळे इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. अशा वेळी खाज, लागसरपणा, जखमा होण्यापासून वाचण्यासाठी तसेच अअंडर आर्म्सचे रॅशेश घालवण्यासाठी करा हे घरगुती उपाय.
खोबरेल तेल
अंडरआर्म्सच्या त्वचेला पडलेले रॅशेश घालवण्यासाठी खोबरेल तेल हा एक चांगला उपाय आहे. या तेलात व्हिटॅमिनचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे हे तेल त्वचेला लावल्याने आराम मिळतो. तसेच इन्फेक्शन होण्याचा धोकाही टळतो. दिवसातून २-३ वेळा तेल लावण्यास काहीच हरकत नाही.
कोरफड
कोरफडीचा गर काढून त्याचा लेप काखेच्या त्वचेला २०/२५ मिनिटे लाऊन ठेवावा. त्यानंतर थंड पाण्याने त्वचा स्वच्छ धुवून घ्यावी. आराम पडतो. तसेच त्वचेचे जळजळने थांबते.
टी ट्री ऑईल
टी ट्री ऑईलममध्ये बॅक्टिरियल गुण असतात. जे घावाची जखम भरून यायला चांगली मदत करतात. यासाठी एक छोटा चमचा टी ट्री ऑलीव ऑईलमध्ये १ थेंब टी ट्री ऑईल टाका. हे मिश्रीन दोन्ही काखांमध्ये लावा. १० मिनीटांनंतर ती जागा धुवून टाका.
अंडरार्म्सचे रॅशेश दूर करण्यासाठी हे घरगुती उपाय करून पाहा.