Veg Sources of Protein News In Marathi : बहुतेक लोकांचा असा समज आहे की, चिकन, अंडी, मांस आणि मासे यासारख्या मांसाहारी पदार्थांमध्ये जास्तीत जास्त प्रोटीन आढळतात. तुम्ही जर व्हेज आहात आणि तुम्हाला पण असेच वाटतं असेल तर हा तुमचा गैरसमज असेल. कारण असे काही प्रमाणात शाकाहारी पदार्थ देखील आहेत ज्यामधून भरपूर प्रमाणात प्रोटीन आढळतात. जर तुम्ही शाकाहारी असाल तर काळजी करू नका, कारण तुम्ही अनेक शाकाहारी पदार्थ खाऊ शकता, ज्यातून तुम्हाला भरपूर प्रोटीन मिळतील आणि तुमचे शरीर निरोगी राहिल.


दररोज किती प्रोटीन घ्यावे?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रोटीन हा शरीराचा मुख्य भाग असून सरासरी, एखाद्या व्यक्तीला शरीराच्या वजनाच्या प्रति किलोग्रॅम 0.8 ग्रॅम प्रोटीन आवश्यक आहे. दरम्यान एका पुरुषाला सरासरी 56 ग्रॅम प्रोटीन आणि स्त्रीला 46 ग्रॅम प्रोटीनची गरज असते. परंतु जर तुम्ही गरोदर असाल, स्तनपान करणारी आई किंवा खेळाडू असाल तर तुम्हाला जास्त प्रोटीनची गरज आहे. प्रत्येक मील सोबच प्रोटीनचे सेवन करणे गरजेचे आहे. 


वाचा: तुम्हाला झटपट वजन कमी करायचं? मग आहारात 'या' ड्राय फ्रूटसचा करा समावेश 


डाळ- तुमच्या आहारातील प्रथिनांची गरज पूर्ण करण्यासाठी डाळ हा सर्वोत्तम मार्ग आहे. प्रथिनांची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही डाळ शिजवल्यानंतर खाऊ शकता. अर्धा कप शिजवलेल्या डाळीमध्ये 12 ग्रॅम प्रथिने असतात.


पनीर - शाकाहारी लोकांसाठी पनीर प्रोटीनचा चांगला स्रोत आहे. तुम्ही पनीर फक्त स्नॅक्स म्हणून खाऊ शकता.


ओट्स - सुमारे अर्धा कप ओट्समध्ये 6 ग्रॅम प्रथिने आणि 4 ग्रॅम फायबर असते. त्यात मॅग्नेशियम, झिंक, फॉस्फरस आणि फोलेट देखील असतात. यात उच्च दर्जाची प्रथिने असतात.


क्विनोआ - हे प्रथिनांच्या वनस्पती स्त्रोतांपैकी एक आहे. सर्व नऊ आवश्यक अमीनो ऍसिड आहेत. स्नायूंच्या विकासासाठी आणि रोगप्रतिकारक शक्तीच्या सक्रियतेसाठी अमीनो ऍसिड आवश्यक आहेत. हवं तर यामध्ये सॅलड, व्हेजिटेबल बर्गर वगैरेमध्ये मिक्स करुन खाऊ शकता. 


चिया सीड्स - अर्धा कप चिया बियांमध्ये 6 ग्रॅम प्रथिने आणि 13 ग्रॅम फायबर असते. हे लोह, कॅल्शियम, सेलेनियम आणि मॅग्नेशियमचा उत्कृष्ट स्त्रोत आहे. याशिवाय यात ओमेगा-3 फॅटी अॅसिड आणि अँटी-ऑक्सिडंट्स असतात.


 


 


 


 (Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)