Viral News : कांदा (Onion) कापताना डोळ्यातून (Tears) पाणी का येतं? हा प्रश्न तुम्हाला अभ्यासात आलाच असेल. मात्र, कांदा कापताना डोळ्यातून पाणी येऊ नये यासाठी काय करायला हवं यासाठी एक मेसेज व्हायरल (Viral Message) होतोय. दावा आहे की कांदा कापताना च्युइंगम (Chewing Gum) खाल्ल्याने डोळ्यातून पाणी येत नाही. कांदा कापताना डोळ्यात पाणी येतं. काहींना इतकं रडू येतं की कांदा कापण्याचं काम नको रे बाबा असंच वाटतं. काहींनी तर आता कांदा कापण्याच्या मशिन्स घेतल्यायत. कांदा चॉपर असे पर्याय अनेकांनी शोधलेयत..


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र, हा दावा कितपत खरा आहे याची पडताळणी करणं गरजेचं आहे. त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी सुरू केली. मात्र, त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात...


व्हायरल मेसेज
कांदा आणि च्युइंगमचे एकमेकांशी नातं आहे. तुम्ही च्युइंगम खात असाल तर तुमच्या डोळ्यातून पाणी येणार नाही. च्युइंगममध्ये अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्म (Anti-oxidant) असतात. जे आपल्या डोळ्यांच्या अश्रू ग्रंथींना उत्तेजित होण्यापासून रोखतात. या दाव्याबद्दल आम्ही अधिक माहिती जाणून घेतली. आमच्या पडताळणीत काय पोलखोल झाली पाहूयात


व्हायरल पोलखोल
कांदा कापताना च्युइंगम खाल्ल्याने डोळ्यांची आग होतेच. मात्र कांदा कापताना च्युइंगम खाल्ल्यास डोळ्यातून पाणी येत नाही. कांदा जेव्हा आपण कापतो तेव्हा अँटी ऑक्साईड उत्तेजित होतात. च्युइंगम खाताना अँटी ऑक्साईड उत्तेजित होऊ शकतात. अँटी ऑक्साईड दोन ठिकाणी एकाचवेळी उत्तेजित होत नाही


च्युईंगम खाऊन कांदा कापल्यास तोंडात लाळ तयार होऊन डोळ्यातील अश्रू कमी होतात. मात्र, डोळ्यांची आग कमी होत नाही हे आमच्या पडताळणीत समोर आलं.


कांदा कापताना डोळ्यातून पाणी का येतं?
कांदा कापताना डोळ्यातून पाणी का येतं, असा प्रश्ना आपल्या पडतो. वास्तविक कांद्यामध्ये काही गंधसंयुक्ते संयुग आणि एन्झाइमदेखील सुद्धा असतात. मात्र जो पर्यंत कांदा कापत नाहीत तो पर्यंत संयुगे आणि एन्झाइम्स परंपरेपासून दूर राहतात. कांदा कापला गेला की त्या संयुगांचे रुपांतर अॅसिडमध्ये होते आणि एन्झाइम अॅसिडचे रुपांतर गंधकयुक्त ऑक्साईडमध्ये होते. याचं रुपांतर वायूत होऊन ते थेट डोळ्यात शिरते. ही प्रक्रिया डोळ्यातील अश्रुंमधील पाण्याशी होते आणि त्याचे रुपांतर सलफ्युरिक अॅसिडमध्ये होते. हे अॅसिड डोळे चुरचूरण्यास कारणीभूत ठरल्यानंतर डोळ्यातून पाणी येण्यास सुरुवात होते.