मुंबई : अनेकदा आपल्याला सुस्ती येते. काही करण्याची इच्छा होत नाही. डल, डाऊन वाटते. अशावेळी चार्ज अप होण्यासाठी आपण चहा किंवा कॉफी पितो. पण याव्यतिरिक्तही झटपट एनर्जी मिळवण्याचे काही सोपे मार्ग आहेत. जाणून घेऊया...


उन्हात फिरा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोणत्याही बागेत फिरा किंवा हलक्या उन्हात जावून बसा. यामुळे तुमचा मूड सुधारेल. प्रकाशात फिरल्याने मेंदू अधिक सतर्क होतो.


मजेशीर व्हिडिओ पहा


कोणताही मजेशीर किंवा कॉमेडी व्हिडिओ पहा. त्यामुळे तुम्ही हसाल व चार्ज अप व्हाल.


खोल श्वास घ्या


खोल व दीर्घ श्वास घ्या. श्वास घेताना पोटाच्या हालचालींकडेही लक्ष द्या. श्वास घेताना पोट वर येईल आणि श्वास सोडताना ते आत जाईल.


स्वप्नरंजन करा


आपल्या जीवनसाथीबद्दल स्वप्नरंजन केल्यास तुम्हाला चांगलीच किक बसेल. हा अनुभव आनंददायी आणि अल्हाददायी असेल.


संगीत ऐका


उडत्या चालीची गाणी तुम्हाला चार्ज अप करतील. त्यामुळे अशी गाणी ऐका ज्यामुळे तुम्ही उठून नाचायला लागाल.


वॉक घ्या


१० मिनिटे जलद गतीने चालल्याने तुम्ही ४ तासांसाठी सक्रीय होता. या शक्तीचा वापर करा.


स्नॅक्स खा


हेल्दी स्नॅक्स तुम्हाला खूप सारी ऊर्जा प्रदान करेल.