हिवाळ्यात गुळ खाणे खूप फायदेशीर, `या` आजारांपासून मिळेल सुटका
Benefits Of Consuming Jaggery: गुळ हा आरोग्यासाठी पौष्टिक मानला जातो. नैसर्गिक साखर असल्याने याचे शरीराला अनेक फायदे होतात. थंडीत गुळ खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते.
Health Benefits Of Consuming Jaggery In Winter: साखरेऐवजी गुळ खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. अलीकडे गुळात असलेले पौष्टिक तत्वे पाहता. साखरेऐवजी गोड पदार्थांमध्ये गुळ वापरला जातो. हिवाळ्यातील दिवसांत गुळ खाणे हे औषधासमान आहे. थंडीत गुळ खाल्ल्यास आरोग्याला काय-काय लाभ होतात हे जाणून घेऊया.
गुळात असलेले पौष्टिक तत्वे
आपल्या शरीरासाठी आवश्यक असलेले घटक हे गुळामध्ये आढळले जातात. यात व्हिटॅमिन- ए आणि बी, सुक्रोज, ग्लूकोज, लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, जस्त आणि मॅग्नेशियमसारखे घटक आढळले जातात. हिवाळ्यात गूळ शरीरासाठी पॉवर बूस्टर म्हणून काम करतो. तर जाणून घेऊया हिवाळ्यात गूळ खाण्याचे फायदे.
हृदयाच्या आरोग्यासाठी
गुळात आढळली जाणारा नैसर्गिक साखर आणि अँटीऑक्सिडेंट हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. गुळात असलेले पोटॅशियम आणि मॅग्नीशियमसाठी हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. जे ब्लडप्रेशर नियंत्रणात ठेवण्यास मदत ठेवते. हिवाळ्यात अनेकांना हार्ट अॅटेकचा धोका संभवतो. अशावेळी गुळ खाणे कधीही चांगले.
रक्ताच्या गुठळ्या होण्यापासून रोखते
गुळात असलेले अँटीकोगुलेंट गुणधर्म रक्ताच्या गुठळ्या होण्यास रोखते. नसांच्या माध्यमातून शरीरातील सर्व भागातून रक्तप्रवाह सुरळीत होतो. हे संपूर्ण शरीरासाठी खूप चांगले असते.
कोलेस्ट्रॉल कमी होईल
जे लोक रोज साखरेऐवजी गुळाचे सेवन करतात त्यांच्या शरीरात साचलेले बॅड कोलेस्ट्रॉलची लेव्हल कमी होते. त्याचबरोबर लठ्ठपणा कमी करण्यास मदत होते.
रोगप्रतिकारशक्ती वाढेल
हिवाळ्यात रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याची गरज असते. अन्यथा या दिवसांत सर्दी, खोकला आणि ताप या आजारांचे धोका वाढतो. अशातच जर तुमची रोग प्रतिकार शक्ती कमकुवत असेल तर तुम्ही नेहमी आजारी पडाल, त्यामुळं रोज गुळाचा एक खडा तरी चघळा.
शरीराला मिळेल उर्जा
गुळात आढळणारे पोषक तत्वांमुळं तो एक उर्जेचा स्त्रोतही आहे. गुळ खाल्ल्याने एनर्जी मिळते त्याचबरोबर रोजच्या जीवनातील कठिण परिस्थीती हाताळण्यास उर्जा मिळते.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)