Benefits of Evening Walk: सकाळी उठल्यावर आपल्या अनेक चांगल्या सवयी लावून घेणे गरजेचे असते. त्यामुळे आपण आपला दिवस हा चांगल्या प्रकारे घालवू शकतो. आजच्या जगात स्पर्धा प्रचंड वाढली आहे. नात्यांमध्येही बरीच चढाओढ दिसून येते. त्यामुळे आपल्याला आता आपली जीवनशैली सुधारणे अनिवार्य झाले आहे. 2020 साली आलेल्या कोरोनाच्या महामारीनं (Health and Walk) आपल्या सगळ्यांच्याच जीवनशैलीला गालबोट लावलं होतं. आपल्या व्यायामही (Excerise and Walk) घरच्या घरीच करावा लागत होता. त्यामुळे सगळेच हैराण झाले होते. घरीच असल्यामुळे आपल्याला काहीच कळत नव्हते की आपली हालचाल होणार तरी कशी? परंतु आता कोरोनाला तीन वर्षे उलटून गेली आहेत त्यामुळे आपणही त्याप्रमाणे बाहेर जाऊ फिरून लागलो आहोत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यातून आता लॉकडाऊनमुळे ज्या मॉर्निंग वॉकला खंड पडला होता तेही आता सुरळीत सुरू झाले आहे. काहींनी आपली ही सवय परत सुरू केली आहे तर काहींना मात्र पुन्हा याचा आळस आला आहे. परंतु हे असं करून चालणारच नाही. तुम्हाला हे जाणून घेऊन आश्चर्य वाटेल की चालण्याचे एक दोन नाही तर अनेक चमत्कारिक फायदे आहेत. चालण्यानं तुम्हाला तुमच्या आरोग्याला चांगला आराम मिळतो आणि सोबतच तुमच्या आरोग्यालाही चांगला फायदा मिळतो. चालण्याचे असंख्य फायदे आहेत. सोबतच तुम्हाला संध्याकाळच्या चालण्याचेही फायदे या लेखातून सांगणार आहोत. 


काय आहेत संध्याकाळच्या चालण्याचे फायदे? 


  • आपल्याला सर्वांनाच वाटते की आपणही स्लिमट्रिम राहावे. त्यासाठी आपण विशेष मेहनतही करताना दिसतो. परंतु चालल्यानं तुम्ही बारीक होणं साध्य करू शकाल. आपल्याला चालल्यानं निरोगी आणि तंदूरूस्त राहण्यास मदत होते. 

  • संध्याकाळी तुम्हाला कसलाही तणाव नसतो त्यामुळे तुम्ही आनंदानं यावेळी व्यायाम अथवा चालू शकता. 

  • रात्री चालल्यानं तुम्हाला चांगली एनर्जी मिळते. भूक चांगली लागते आणि झोपही चांगली मिळते. 

  • तुम्हाला जर का वजन कमी करायचे असले तर तुम्ही संध्याकाळच्या चालण्याचा अवलंब करू शकता. 

  • रोज 1 तास जास्तीत जास्त आणि कमीत कमी 45 मिनिटे चालण्याची प्रॅक्टिस ठेवा.

  • तुमची चालण्याची सवय गेली असेल तर काहीच हरकत नाही परंतु तुम्हाला यासाठी योग्य ती काळजी घेत आपलं चालणं सुरू केलं पाहिजे. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)