मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. ऑक्टोबर महिना गाठला असला तरी कोरोनाबाधितांचा आकडा काही कमी होत नाही. अशावेळी भारतातील प्रत्येक जण कोरोना व्हॅक्सीनची आतुरतेने वाट पाहत आहेत. कोरोनावर लस आली की सगळेच जण मोकळा श्वास घेतील. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याबाबत एम्सचे संचालक डॉक्टर गुलेरिया यांनी यासंदर्भात महत्वाची माहिती दिली. कोरोनावर लस कधी येईल याची माहिती अद्याप नाही. पण भारतात फेज टू आणि थ्रीवर ट्रायल सुरू आहेत. यामध्ये दोन ते तीन रिझल्ट चांगले आले आहेत. रिझल्ट आणि फॉलोअपमध्ये लस जर सुरक्षित असल्यातं सिद्ध झालं. आणि त्याचे शरीरावर होणारे साईड इफेक्ट कमी आहेत. त्यामुळे ही लस अत्यंत फायदेशीर आणि महत्वाची असल्याचं कळतं. 


तयार होत असलेल्या लस शरीरात एँटीबॉडी तयार करतात. मात्र, संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर या एँटीबॉडी किती काम करतात. हे कळल्यानंतर व्हॅक्सीन पुढच्या दिशेला जाईल. डॉक्टर गुलेरिया म्हणाले की, व्हॅक्सीन डोसवर देखील काम केलं जात आहे. या सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या तर पुढच्या वर्षी म्हणजे २०२१ च्या जानेवारीत कोरोनावर लस येईल. 


कधी होणार सामान्य स्थिती 


डॉक्टर गुलेरियाने सांगितलं की, अनेकांच्या मनात प्रश्न आहेत की, ही परिस्थिती सामान्य कधी होणार. कोणतीही भीति मनात न ठेवता आपण सहज कधी फिरू शकतो. या वर्षाच्या अखेरीस किंवा पुढच्या वर्षाच्या सुरूवातीलाच ही स्थिती सामान्य होण्याची शक्यता आहे. 


कोरोना व्हायरस हा पूर्णपणे संपणार नाही पण कोरोना आपल्या अवाक्यात येईल. आपण कोरोनाला काही प्रमाणात आटोक्यात आणू शकतो.