Premature White Hair​: तरुणांचे केस पाढंरे व्हायचे प्रकार समोर येत आहेत. हल्लीच्या काळात मुलगा असो या मुलगी या दोघानांही या समस्यांना सामोरे जावे लागते याची कारणे वेगवेगळी असू शकतात. काहींना आजार असतो तर काहींना तणाव. (White Hair Why does your hair turn white when you are young then do this remedy nz)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सगळेच या प्रक्रियेतून जात असतात. मग अशावेळेस निसर्गिकरित्या केस काळे कसे राहतील हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. तुम्हाला केस काळे राहावेत यासाठी महागड्या प्रोडक्टची खरेदी करण्याची गरज नाही. आज आम्ही तुम्हाला निसर्गिकरित्या केस काळे राहतील या संदर्भात काही टिप्स देणार आहोत...


आणखी वाचा - Women's health : महिलांमध्ये 'हे' आजार आहेत कॉमन... वेळीच काळजी घ्या...


सामग्री-


सर्वप्रथम एक कप मोहरीचे तेल आणि सोबत एक ग्लास पाणी, कढीपत्ता, कोरफडीचा तुकडा, कलोंजी (निगेला), फ्लेक्स सीड (फ्लेक्स सीड) आणि काळे जिरे (कारावे सीड्स) घ्या.


आणखी वाचा - Empty Stomach: उपाशी पोटी हे 3 पदार्थ खाणे टाळा नाहीतर...


असं तयार करा तेल


सर्व प्रथम, एक ग्लास पाणी उकळवा आणि त्यामध्ये कढीपत्ता घाला, कोरफडचा तुकडा घाला आणि पाण्यात काळे जिरे आणि बडीशेप सोबत एक चमचा फ्लेक्स बिया घाला. पाणी अर्ध्यापेक्षा कमी राहिल्यावर त्या पाण्यात एक वाटी मोहरीचे तेल टाकून परत एकदा शिजवून घ्या. त्यानंतर त्या पाण्याला तेलाचे स्वरुप येईल. त्यानंतर आठवड्यातून किमान दोनदा हे तेल लावा. पांढर्‍या केसांच्या समस्येपासून तुमची लवकरच सुटका होईल.


 (Disclaimer: वरील माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)