Women's health : महिलांमध्ये 'हे' आजार आहेत कॉमन... वेळीच काळजी घ्या...

आज आपण महिलांना असे कोणते 4 आजार होतात याविषयी जाणून घेणार आहोत...

Updated: Oct 3, 2022, 08:57 PM IST
Women's health : महिलांमध्ये 'हे' आजार आहेत कॉमन... वेळीच काळजी घ्या... title=
Womens health These diseases are common in women Take care on time nz

Women's health : आरोग्य हिच धनसंपदा हे आपल्याला शाळेत असल्यापासून शिकवले जात आहे. पण अनेकदा महिला त्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत नाहीत.  कुंटूबाची जवाबदारी असल्यामुळे महिलांना स्वत:चा आरोग्यावर फारसे लक्ष देता येत नाही. 

पण वेळीच लक्ष न दिल्यामुळे आजार होण्याची शक्यता जास्त असते. अनेकदा परिस्थिती हाताबाहेर जाते. मग अशावेळेस उपचाराशिवाय काहीच हातात उरत नाही. आज आपण महिलांना असे कोणते 4 आजार होतात याविषयी जाणून घेणार आहोत...(Womens health These diseases are common in women Take care on time nz)

1. मधुमेह (Diabetes)
हा आजार रक्तात साखरेची पातळी वाढल्यामुळे होतो. हा आजार महिलांना गर्भधारणेदरम्यान होतो. मधुमेह हा आजार असल्यास त्या काळात महिलांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. महिलांनी संतूलित आहार घेण्यावर भर द्यावा. 

2. थायरॉईड (Thyroid)
थायरॉईड ही एक लहान ग्रंथी असून तिचा आकार एका फुलपाखरासारखा असतो आणि ती मानेच्या खालच्या भागात स्थित असते. तिचं मुख्य कार्य म्हणजे शरीराच्या चयापचय क्रियेचं नियंत्रण ठेवणे. महिलांमध्ये थायरॉईडचे प्रमाण अधिक असते. हा त्रास सततच्या येणाऱ्या स्ट्रेसमुळे होत असतो.

3. पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम किंवा PCOS
महिलांमध्ये पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम अधिक सामान्य आहे. हार्मोन्स असंतुलित असल्यामुळे हा त्रास जाणवतो. इन्सुलिनचा अतिरेक, इंफ्लेमेशन, आनुवंशिकता इत्यादींमुळे (common health problems in women) हा आजार वाढतो.

आणखी वाचा - Emotionally Manipulated : तुमच्या नात्यात manipulate सारख्या समस्या आहेत का?

4. एनीमिया (Anemia)
धावपळीच्या जगात कोणालाच स्वत:वर लक्ष द्यायला वेळ नसतो. महिलांचा आहार संतुलित नसल्यामुळे त्यांना अशक्तपणाच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळेच त्यांच्या शरीरात रक्ताची कमतरता जाणवते. 

 (Disclaimer: वरील माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

आणखी वाचा - Garba Benefits: गरबा खेळण्याचे 'हे' फायदे वाचून लगेचच थिरकण्यास सुरुवात कराल