मुंबई : वजन घटवण्याच्या मिशनवर असणार्‍या अनेकांची दिवसाची सुरवात ग्लाभर पाणी आणि मधाच्या मिश्रणाने होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध पाण्याच्या मिश्रणामुळे  शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होते. पण गरम किंवा उकळत्या पाण्यामध्ये मध मिसळणे फायदेशीर आहे का ? असा विचारही अनेकांच्या मनात येतो. संशोधनानुसार, मध रॉ स्वरूपात आहारात घेणे अधिक फायदेशीर असते. मधातील दाहशामक आणि अ‍ॅन्टीबॅक्टेरिअल घटक गुणकारी असतात. कच्च्या स्वरूपात मधातील हे गुणधर्म शरीरात अधिक चांगल्याप्रकारे शोषले जातात. मात्र मध गरम केल्यानंतर किंवा उकळत्या पाण्यात,चहात मिसळल्यास त्यामधील पोषकता कमी होते. काही वेळेस  मध गरम करणे त्रासदायक ठरू शकते.


आयुर्वेदानुसार, गरम केलेले मध किंवा मध तूप सम प्रमाणात घेतल्यास त्याचा आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतो.  Journal of Research in Ayurveda च्या २०१० साली प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, 140°C पेक्षा अधिक उष्णता मधाला मिळाल्यास त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कमी होते. 60º ते 140°C दरम्यान मध गरम केल्यास  hydroxymethyl furfuraldehyde  चे प्रमाण वाढते. कार्बोहायड्रेट रिच पदार्थांचे डिहायड्रेशन होते तसेच साखरेची रिअ‍ॅक्शन होते. त्यामुळे आरोग्यावर त्रासदायक परिणाम होतात.


मधाचा कशाप्रकारे वापर करणे अधिक फायदेशीर आहे ?


मधाचा मूळात रॉ स्वरूपात वापर करणेच अधिक फायदेशीर आहे. मधाला गरम  केल्यास त्या मधील  फ्लेवर्स नष्ट  होतात.  त्यामुळे  मध  केवळ  शुगर सिरप प्रमाणे बनते. गरम  पाण्यात  मध  आणि लिंबाचा रस  एकत्र  करुन  पिणे  फायदेशीर आहे.  मात्र  मध  समप्रमाणात तुपासोबत खाऊ  नका. किंवा जेवणात वापरू नका.  जेवणात  साखरे ऐवजी  गोडवा वाढवण्यासाठी मधाचा वापर करण्या ऐवजी गूळ वापरा .